PSL 2022 Shaheen Afridi Back To Back sixes in final over reaction goes viral  Sakal
क्रीडा

VIDEO : शाहिन शाह आफ्रिदीची स्फोटक फलंदाजी, रिअ‍ॅक्शन व्हायरल

सुशांत जाधव

PSL 2022 : लाहोर कलंदर्सचा कर्णधार शाहीन आफ्रिदी (Shaheen Shah Afridi i) याने पाकिस्तान सुपर लीगमध्ये (PSL) आपल्या भात्यातील फटकेबाजीचा नजराणा दाखवून दिला. पेशावर झल्‍मी विरुद्धच्या सामन्यात त्याने तुफान फटकेबाजी करत त्याने सामना सुपर ओव्हरमध्ये नेला. लाहोर कलंदर्स (Lahore Qalandars) आणि पेशावर (Peshawar Zalmi)जल्‍मी यांच्यात पीएसएल 2022 चा सामना रंगला होता. या सामन्याचा निकाल सुपर ओव्हरमध्ये लागला. आफ्रिदीच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला असता तरी भेदक मारा करणाऱ्या या गोलंदाजने केलेल्या फटकेबाजीची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

लाहोर संघाला अखेरच्या षटकात 24 धावांची गरज होती. शाहिन आफ्रिदी आणि फवाद अहमद ही जोडी क्रीजमध्ये होती. पेशावरकडून मोहम्‍मद उमर अखेरच षटक घेऊन आला. त्याने व्हाईड चेंडू टाकत षटकाची सुरुवात केली. त्यानंतर पहिल्या चेंडूवर आफ्रिदीनं खणखणीत चौकार मारला. त्यानंतरच्या दोन चेंडूवर आफ्रिदीनं दोन षटकार खेचत सामन्यातील रंगत वाढवली. (PSL 2022 Shaheen Afridi Back To Back sixes in final over reaction goes viral watch Video)

लाहोरच्या संघाला अखेरच्या तीन चेंडूवर 7 धावांची गर होती. सामना लोहारच्या बाजूनं झुकलाय असे वाटत असताना मोहम्मद उमरनं दोन चेंडू निर्धाव टाकले. शाहिन आफ्रिदीनं अखेरच्या चेंडूवर उत्तुंग षटकार मारून सामना चाय केला. शाहिन आफ्रिदीने अखेरच्या षटकात 22 धावा केल्या. त्याने 20 चेंडूत 2 चौकार आणि 4 षटकाराच्या मदतीने नाबाद 39 धावा कुटल्या.

सुपर ओव्हरमध्ये पेशावरनं जिंकला सामना

कर्णधार आफ्रिदीच्या धमाकेदार खेळीच्या जोरावर सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. पण अखेर या सामन्यात बाजी मारली ती पेशावर संघानं. पेशावरकडून सुपर ओव्हरमध्ये वहाब रियाजनं घात गोलंदाजी केली. टी 20 जगातील स्टार शोएब मलिकनं दोन चौकार खेचून पेशावर संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : आषाढी वारीत दुर्दैवी घटना! जेजुरीजवळ ट्रकची वारकऱ्यांना धडक, ३ महिलांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी

Ashadhi Wari: पंढरपुरात सायकलवारीचा जल्लोष! महाराष्ट्र-कर्नाटकातील ४ हजार सायकलस्वारांची हरिनामाच्या गजरात नगरप्रदक्षिणा

Nagpur: विक्रेत्याच्या चुकीची शिक्षा आता खरेदीदाराला नाही; जीएसटीच्या नियमांमध्ये होणार बदल

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी महाराष्ट्र भाजपच्या कोअर कमिटीची आज बैठक

Petrol-Diesel Price Today: अमेरिका-इराण संघर्षानंतर देशात इंधनाचे नवे दर जाहीर! 13 जुलैला पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT