psl 2023-playoffs-may-be-postponed-or-shifting-to-karachi-or-uae-due-to Imran Khan News political-unrest-in-pakistan  SAKAL
क्रीडा

PSL 2023 : इम्रान खानवरून पाकिस्तानात गदारोळ! PSL प्लेऑफवर संकटाचे ढग

इम्रान खानवर झालेल्या गोंधळानंतर PSL 2023 मध्ये खळबळ

Kiran Mahanavar

PSL 2023 : माजी पंतप्रधान इम्रान खान यांची अटक रोखण्यासाठी पाकिस्तानात गदारोळ सुरू आहे. या संपूर्ण देशात राजकीय अस्थिरता पसरली आहे. त्याचा दुष्परिणाम आता पाकिस्तान सुपर लीगवरही होत आहे.

लाहोरमध्ये झालेल्या प्रचंड गोंधळानंतर आता पीएसएल 2023 चे प्लेऑफ सामने पुढे ढकलले जाऊ शकतात. इतकंच नाही तर गरज पडल्यास उर्वरित चार सामनेही पाकिस्तानच्या बाहेर हलवल्या जाऊ शकतातअशीही बातमी आहे.

लाहोरमध्ये सध्या परिस्थिती वाईट झाली आहे. याच कारणामुळे मुलतान सुलतान आणि लाहोर कलंदर या संघांचे मंगळवारी सराव सत्रही रद्द करावे लागले. या दोघांमधील क्वालिफायर सामना लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर आज खेळल्या जाणार आहे.

सध्या लाहोरमध्ये अनेक ठिकाणी पोलिस आणि इम्रान खान यांच्या समर्थकांमध्ये जोरदार चकमक सुरू आहे. त्यामुळेच पीसीबी प्रमुख नजम सेठी यांनी पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्र्यांकडे पीएसएल संघांची सुरक्षा वाढवण्याची मागणी केली आहे.

पाकिस्तानी मीडियानुसार पीसीबीची तातडीची बैठक होणार असून त्यानंतर पीएसएल 2023च्या भविष्याबाबत निर्णय घेतला जाईल. गरज पडल्यास प्लेऑफचे सामने कराचीला हलवले जाऊ शकतात, असे मानले जात आहे. तिथेही परिस्थिती बिकट राहिल्यास पीएसएलचे उर्वरित सामने यूएईमध्येही खेळल्या जाऊ शकतात.

लाहोर कलंदर आणि मुलतान सुलतान यांच्यातील क्वालिफायर सामना होणार का हा सध्याचा सर्वात मोठा प्रश्न आहे. वेळापत्रकानुसार 16 मार्च रोजी इस्लामाबाद आणि पेशावर जाल्मी यांच्यात सामना होणार आहे. दुसरा क्वालिफायर 17 मार्चला होणार आहे आणि पीएसएलचा अंतिम सामना 19 मार्चला होणार आहे. मात्र या सर्व सामन्यांचे भवितव्य पीसीबीच्या बैठकीतच ठरवले जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 1,500 अंकांनी खाली; कारण काय? कोणत्या शेअर्सला फटका?

IPL 2026: राजस्थान एक्स्प्रेसला अधिक संधी सातत्याचा अभाव असलेल्या सनरायझर्स हैदराबादविरुद्ध आज सामना, कशी असेल प्लेइंग-११

Latest Marathi News Live Update : धाराशिवमध्ये शिवसेनेतील गटबाजी पुन्हा उफाळली,नजर कैदेत ठेवलेले शिवसैनिक आक्रमक

Gadchiroli News: सेंद्रीय शेती, किचन गार्डनच्या माध्यमातून नेहारपायली पुढे; गावाचा एकोपा यशाची गुरुकिल्ली; सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम

Pavangad Fort Shivling Discovery : पावनगडावरील दर्ग्याखालील ढिगाऱ्यात सापडलं एक फूट रुंदीचं पुरातन शिवलिंग, किल्ल्यावरील प्राचीन हिंदू संस्कृतीचा वारसा अधोरेखित!

SCROLL FOR NEXT