mayank agarwal sakal
क्रीडा

Punjab Kings Captaincy : मयंकची कॅप्टन्सी काढली? पंजाब किंग्ज संघानं दिलं स्पष्टीकरण

नवीन हंगामात पंजाब किंग्जचा कर्णधार बदलणार का? मयंकला काढून टाकल्याच्या अफवेवर संघाचे हे वक्तव्य...

Kiran Mahanavar

Punjab Kings Captaincy : आयपीएल फ्रँचायझी पंजाब किंग्जने गुरुवारी लीगच्या पुढील हंगामापूर्वी संघाच्या कर्णधारपदात संभाव्य बदलाच्या अफवा फेटाळून लावल्या आहेत. या आठवड्याच्या सुरुवातीला मीडियामध्ये अशी अटकळ होती की संघाचा कर्णधार मयंक अग्रवालला आयपीएल 2023 पूर्वी वगळले जाऊ शकते. त्याच्या जागी इंग्लंडचा यष्टिरक्षक-फलंदाज जॉनी बेअरस्टोकडे कर्णधारपद सोपवले जाऊ शकते.

पंजाब किंग्सने अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, पंजाब किंग्ज फ्रँचायझीच्या कर्णधारपदाशी संबंधित अनेक बातम्या क्रीडा वेबसाइट्सनी प्रकाशित केल्या आहेत. आम्ही सांगू इच्छितो की संघाच्या कोणत्याही अधिकाऱ्याने यावर कोणतेही विधान जारी केलेले नाही. मयंक अग्रवालला आयपीएल 2022 पूर्वी संघाचा कर्णधार बनवण्यात आले होते. त्याला केएल राहुलच्या जागी ही जबाबदारी देण्यात आली होती. राहुल नवा संघ लखनऊचा कर्णधार झाला.

मयंकसाठी आयपीएल 2022 चा हंगाम निराशाजनक होता. त्याला 12 सामन्यात 16.33 च्या सरासरीने केवळ 196 धावा करता आल्या. यादरम्यान त्याची सरासरी 122.5 होती. तो आपल्या संघातील पहिल्या पाच फलंदाजांमध्येही नव्हता. त्याच्या कर्णधारपदाबद्दल बोलताना पंजाबचा संघ गुणतालिकेत सहाव्या क्रमांकावर होता. तुफानी फलंदाजी फौज असूनही संघ प्लेऑफपर्यंत पोहोचू शकला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

फसव्या जाहिराती, निकृष्ट दर्जा! सौंदर्यप्रसाधनांवर FDAची कारवाई; गैरप्रकार सहन केला जाणार नाही, तुकाराम मुंढेंचा इशारा

Sindhudurg Rain Update : सिंधुदुर्गकरांनो, आणखी वाट पाहावी लागणार! मॉन्सून पूर्णपणे मंदावला; पाहा पुढील 4 दिवसांचा अंदाज, शेतीची कामे रखडली

Fifa World Cup 2026 : जपानी फॅन्स मॅचनंतर स्टेडियममधील कचरा का उचलतात? त्या तरूणीनं 'Meiwaku' बद्दल सांगितलं, जाणून घ्या काय आहे ते?

Nagpur: पाण्याचे शिंतोडे उडाल्याच्या वादातून खून;कळमन्यातील घटना; दोन कुटुंबातील सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Satara Sangli Election: सातारा-सांगली निवडणुकीत मोठा सस्पेन्स! राष्ट्रवादीची नाराजी उघड, भाजपला मित्रपक्षांची साथ मिळणार का?

SCROLL FOR NEXT