PV Sindhu HS Prannoy Reached Malaysia Masters Badminton Tournament esakal
क्रीडा

Malaysia Masters | सिंधू, प्रणॉय उपांत्यपूर्व फेरीत दाखल

अनिरुद्ध संकपाळ

क्वालालांपूर : भारताची दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधू (PV Sindhu) आणि एचएस प्रणॉय (HS Prannoy) यांनी मलेशिया मास्टर्स (Malaysia Masters) स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. क्रमवारीत सातव्या क्रमांकावर असलेल्या सिंधूने क्रमवारीत 32 व्या स्थानावर असणाऱ्या चीनच्या झांग यी मानचा 21-12, 21-10 अशा दोन सरळ गेममध्ये पराभव केला. सिंधूने हा सामना 28 मिनिटात संपवला.

जरी आजचा सामना सिंधूने सहज जिंकला असला तरी आता सिंधूसाठी उपात्यंपूर्व फेरी आव्हानात्मक असणार आहे. तिचा सामना तैवानच्या ताई त्झू यिंगसोबत होणार आहे. जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या ताईने आतापर्यंत 16 वेळा सिंधूचा पराभव केला आहे. तर सिंधूला तिच्याविरूद्ध फक्त 5 वेळा विजय मिळवता आला आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या मलेशिया ओपनमध्ये सिंधूला ताईने उपांत्यपूर्व फेरीतच पराभूत केले होते.

दुसरीकडे पुरूष एकेरीमध्ये प्रणॉयने तैवानच्या वांग त्झू वेईचा 21-19, 21-16 असा सगळ दोन गेममध्ये पराभव केला. आता त्याचा उपांत्यपूर्व फेरीत सामना जपानच्या त्सुनेयामा बरोबर होणार आहे. दुसऱ्या बाजूला बी. एस. प्रणीत आणि माजी राष्ट्रकुल विजेता परूपल्ली कष्यप स्पर्धेतून बाहेर गेले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Update: LPG कनेक्शनबाबत सरकारची मोठी अपडेट! 14.2 किलोच्या घरगुती सिलेंडरवर काय निर्णय?

AI आणि रोबोट्समुळे नोकऱ्या धोक्यात! बिल गेट्स यांना चिंता; ‘ह्यूमन रिजर्व्ड’चा फॉर्म्युला सुचवला, आरक्षणाची मागणी

Pancreatic Cancer Breakthrough: कॅन्सर उपचारात महत्त्वाची बातमी! पॅनक्रियाटिक कॅन्सरविरोधात मोठं यश; नव्या औषधाला FDAची मंजुरी

शिवीगाळ करणाऱ्याला श्वेता तिवारीने शिकवला धडा; शोधून काढत लेखी माफीनामा घेतला

Numerology: गर्दीतही वेगळी ओळख! इतर लोकांपेक्षा वेगळा विचार का करतात 'या' मूलांकाचे लोक? ट्रेंड फॉलो करत नाहीत...

SCROLL FOR NEXT