PV Sindhu Female Flag Bearer Paris Olympics 2024  sakal
क्रीडा

Paris Olympics : पी. व्ही. सिंधू भारताची ध्वजवाहक! ऑलिंपिकसाठी गगन नारंग पथकप्रमुख

India at Paris Olympics 2024 : ऑलिंपिक ब्राँझपदक विजेते नेमबाज गगन नारंग यांची आगामी पॅरिस ऑलिंपिकसाठी भारतीय पथकाचे प्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे तर...

Kiran Mahanavar

PV Sindhu Female Flag Bearer Paris Olympics 2024 : ऑलिंपिक ब्राँझपदक विजेते नेमबाज गगन नारंग यांची आगामी पॅरिस ऑलिंपिकसाठी भारतीय पथकाचे प्रमुख म्हणून निवड करण्यात आली असून उद्‌घाटन सोहळ्याप्रसंगी पी. व्ही. सिंधू ही भारताची ध्वजवाहक असणार आहे. भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या अध्यक्षा पी. टी. उषा यांच्याकडून ही घोषणा सोमवारी करण्यात आली.

मेरी कोम हिने भारतीय पथकप्रमुख पदावरून माघार घेतली होती. तिच्याऐवजी एका व्यक्तीची निवड करावयाची होती. पी. टी. उषा याप्रसंगी म्हणाल्या, मेरी कोमने माघार घेतल्यानंतर ती जागा रिक्त झाली होती. भारतीय पथकप्रमुखपदासाठी ऑलिंपिक पदक विजेत्या खेळाडूच्या नावाला प्राधान्य देण्यात आले. त्यामुळे गगन नारंग यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

पुरुष ध्वजवाहक म्हणून टेबलटेनिसपटू शरथ कमल याच्या नावावर मार्च महिन्यातच शिक्कामोर्तब करण्यात आला होता. पण महिला ध्वजवाहकाची निवड करणे बाकी होते. अखेर पी. व्ही. सिंधू हिच्या नावावर मोहर उमटवण्यात आली. सलग दोन ऑलिंपिकमध्ये पदक जिंकणारी एकमेव महिला खेळाडू म्हणून तिची निवड करण्यात आली, असे पी. टी. उषा म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नोरासारखी दिसायला पाहिजे, पत्नीला दररोज ३ तास...; पतीकडून छळ, महिलेची पोलिसात तक्रार

Maharashtra Latest News Update: माजी आमदार बाबाजानी दुर्रानी यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत सदस्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

रील्सचा मोह करतोय मेंदूवर दारूसारखा परिणाम? जाणून घ्या धोके आणि तज्ज्ञांनी सांगितलेले उपाय

माेठी बातमी! 'इंडिया आघाडीचे खासदार आक्रमक; दूध दर वाढीसाठी संसद भवनासमोर आंदोलन', भेसळ करणाऱ्यांवर कारवाई करा

Pune Rain Update : ताम्हिणी घाटात ५७५ मिमी पावसाची नोंद; पुण्यात रेड अलर्ट

SCROLL FOR NEXT