Commonwealth games 2022 pv sindhu sakal
क्रीडा

Commonwealth Games 2022 : आजपासून थरार; सिंधू भारताची ध्वजधारक

इंग्लंडमध्ये तब्बल २० वर्षांनंतर आयोजित होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेला आजपासून प्रारंभ होत आहे. २८ जुलैला उद्‍घाटन होणाऱ्या या स्पर्धेचा समारोप आठ ऑगस्ट रोजी होणार

सकाळ वृत्तसेवा

बर्मिंगहॅम : इंग्लंडमध्ये तब्बल २० वर्षांनंतर आयोजित होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेला आजपासून प्रारंभ होत आहे. २८ जुलैला उद्‍घाटन होणाऱ्या या स्पर्धेचा समारोप आठ ऑगस्ट रोजी होणार आहे. स्पर्धेतील २५ क्रीडा प्रकारांत ७२ देशांतील तब्बल ५०५४ खेळाडू सहभागी होणार असून भारताने या क्रीडा स्पर्धेसाठी २१५ खेळाडूंचे पथक पाठविले आहे. दुखापतीमुळे भालाफेकपटू नीरज चोप्राने अंतिम वेळी माघार घेतल्यामुळे दुहेरी ऑलिंपिक पदक विजेती बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू भारतीय पथकाची ध्वजधारक असणार आहे.

यंदा राष्ट्रकुलमध्ये पहिल्यांदाच महिला क्रिकेटलाही संधी देण्यात आलेली असल्याने हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघाकडूनही पदकाची आशा असेल. यासह मीराबाई चानू, बजरंग पुनिया, अविनाश साबळे, लोवलिना बार्गोहेन, निखत झरीन, मनिका बत्रा, किदांबी श्रीकांतसह सर्व खेळाडूंवरही भारतीय चाहत्यांची नजर असेल.

७२ देशांतील ५०५४ खेळाडू सर्वस्व पणाला लावणार

२८ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत रंगणाऱ्या या स्पर्धांमध्ये ७२ देशांतील ५०५४ खेळाडू पदक जिंकण्यासाठी सर्वस्व पणाला लावणार आहेत. ८ ऑगस्टला या क्रीडा स्पर्धांचा समारोप होईल. इंग्लंडमध्ये तब्बल २० वर्षांनंतर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. याआधी २००२ मध्ये इंग्लंडमधील मँचेस्टर या ठिकाणी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्याआधी १९३४ मध्ये इंग्लंडमधील लंडन या शहरात ही क्रीडा स्पर्धा भरवण्यात आली होती. भारतामध्ये २०१० मध्ये या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. भारतात आतापर्यंत एकदाच ही स्पर्धा खेळवण्यात आली आहे.

प्रतिष्ठेच्या स्पर्धेतील आकडेवारी

सहभागी देश - ७२

सहभागी खेळाडू - ५०५४

खेळ - २५

उद्‌घाटन - २८ जुलै

समारोप - ८ ऑगस्ट

हे आहेत खेळ

३ बाय ३ बास्केटबॉल, ३ बाय ३ व्हीलचेअर बास्केटबॉल, ॲक्वेटीक्स डायविंग, ॲक्वेटीक्स जलतरण (पॅरा जलतरणसुद्धा), ॲथलेटिक्स (पॅरा ॲथलेटीक्ससुद्धा), बॅडमिंटन, बीच व्हॉलीबॉल, बॉक्सिंग, महिला क्रिकेट टी-२०, सायकलिंग (माऊंटेन बाईक), सायकलिंग (रस्ते), सायकलिंग (ट्रॅक आणि पॅरा ट्रॅक), जिम्नॅस्टीक्स (आर्टिस्टीक), जिम्नॅस्टीक्स (रिदमीक), हॉकी, ज्युडो, लॉन बाऊल्स (पॅरा लॉन बाऊल्स), नेटबॉल, पॅरा पॉवरलिफ्टिंग, रग्बी सेव्हन्स, स्क्वॉश, टेबल टेनिस (पॅरा टेबल टेनिस), ट्रायथलॉन (पॅरा ट्रायथलॉन), वेटलिफ्टिंग, कुस्ती.

या स्थळांवर होणार स्पर्धा

बर्मिंगहॅम, वेस्ट मिडलँड विभाग, ग्रेटर लंडन

ॲलेक्झँडर स्टेडियमवर रंगणार उद्‌घाटन सोहळा

बर्मिंगहॅममधील ॲलेक्झँडर स्टेडियममध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचा उद्‌घाटन सोहळा रंगणार आहे. येथे ३० हजार क्रीडाप्रेमींच्या उपस्थितीत या मानाच्या क्रीडा स्पर्धांचा श्रीगणेशा होईल. म्युझिक बॅंड डुरॅन डुरॅन व रॉक बँड ब्लॅक सबाथ यांचा कलाविष्कार या सोहळ्यात आकर्षणाचे केंद्रबिंदू असणार आहे.

उद्‌घाटन सोहळ्याची भारतीय वेळ व थेट प्रक्षेपण वाहिनी

मध्यरात्री ११.३० पासून सुरुवात

सोनी टेन, सोनी सिक्स, डीडी स्पोर्टस्‌

या खेळाडूंवर असणार नजर

ॲडम पिटी (जलतरण)

इमा मॅकीनोन (जलतरण)

कोडी सिम्पसन (जलतरण)

पँडलेला रिनोंग (डायव्हिंग)

आंद्रे ग्रेस (ॲथलीट)

शेली फ्रेझर (ॲथलीट)

पॉल कोल (स्क्वॉश)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

H-1B Visa Fee Hike : अमेरिकेने एच-१ बी व्हिसा केला महाग, भारतीयांवर होणार थेट परिणाम, नेमंक काय घडलं?

SSC Paper Leak News: खळबळ! दहावी पूर्व परीक्षेचा पेपर फुटल्याची चर्चा?, समाज विज्ञानचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल

भारतीय क्रीडा विश्वावर शोककळा! ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या खेळाडूचे निधन

Latest Marathi News Live Update : जालन्यात ऐन महानगरपालिका निवडणुकीच्या काळात आधार, पॅन आणि मतदान कार्ड कचऱ्यात

Nitin Gadkari: गरिबांचे जीवन सुसह्य करण्याचा संकल्प: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी; पश्चिम, उत्तर नागपूरमधील मतदारांशी साधला संवाद!

SCROLL FOR NEXT