Quinton de Kock esakal
क्रीडा

Quinton de Kock : 6 सामन्यात 4 शतकं! क्विंटन डिकॉकने रचला इतिहास, आता रडारवर रोहित

अनिरुद्ध संकपाळ

Quinton de Kock : दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर क्विंटन डिकॉकचा हा शेवटचा वर्ल्डकप आहे. दक्षिण आफ्रिका आज पुण्यात न्यूझीलंडविरूद्ध आपला सातवा सामना खेळत आहे. त्यात क्विंटन डिकॉकने शतकी खेळी करत संघाला दमदार सुरूवात करून दिली.

क्विंटन डिकॉकचे हे शतक ऐतिहासिक ठरले. हे त्याचे यंदाच्या वर्ल्डकपमधील चौथे शतक आहे. तो आता एकाच वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक शतके ठोकणाऱ्यांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे. याचबरोबर तो दक्षिण आफ्रिकेकडून एका वर्ल्डकपमध्ये 500 पेक्षा जास्त धावा करणारा पहिला फलंदाज ठरला आहे.

क्विंटन डिकॉकने न्यूझीलंडविरूद्धच्या सामन्यात 116 चेंडूत 114 धावांची झंजावाती शतकी खेळी केली. हे त्याचे यंदाच्या वर्ल्डकपमधील चौथे शतक ठरले. यापूर्वी त्याने श्रीलंकेविरूद्ध 84 चेंडूत 100, नेदरलँड्सविरूद्ध 106 चेंडूत 109 आणि बांगलादेश विरूद्ध 140 चेंडूत 174 धावांची शतकी खेळी केली होती.

डिकॉकचे हे या वर्ल्डकपमधील चौथे शतक आहे. तो आता एका वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्यांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. या यादीत 5 शतकांसह रोहित शर्मा अव्वल स्थानावर आहे. डिकॉककला या रेकॉर्डची बरोबरी आणि हे रेकॉर्ड मोडण्याची देखील संधी आहे.

रोहित शर्माने 2019 च्या वनडे वर्ल्डकपमध्ये 5 शतके ठोकली होती. तर कुमार संगकाराने 2015 च्या वर्ल्डकपमध्ये 4 शतके ठोकली होती.

दक्षिण आफ्रिकेकडून क्विंटन डिकॉकने 500 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेकडून एका वनडे वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत डिकॉकनंतर दुसऱ्या स्थानावर जॅक कॅलिस आहे. त्याने 2007 च्या वर्ल्डकपमध्ये 485 ( 9 डावात) धावा केल्या होत्या. तर 2015 च्या वर्ल्डकपमध्ये 482 (7 डावा) धावा करणाऱ्या एबी डिव्हिलियर्स तिसऱ्या स्थानावर आहे.

ग्रॅम स्मिथने 2007 च्या वर्ल्डकपमध्ये 10 डावात 443 धावा केल्या होत्या. तो या यादीत चौथ्या स्थानावर आहे. तर 1992 च्या वर्ल्डकपमध्ये 8 डावात 410 धावा करणारा पीटर किरस्टन हा पाचव्या स्थानावर आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

Crime News : कसबे सुकेणे हादरले! शाळकरी मुलींच्या अपहरणाचा प्रयत्न, गावकऱ्यांनी आरोपींना दिला चोप

Thane News: मराठीसाठी लढणाऱ्यांवर गुन्हे दाखल झाल्यास स्वराज्य विनामूल्य केस लढणार, ॲड. जय गायकवाड यांची भूमिका

Shravan Pradosh Vrat 2025: यंदाच्या श्रावणात किती प्रदोष व्रत आहेत? जाणून घ्या तारीखा आणि त्यांचे आध्यात्मिक महत्त्व

SCROLL FOR NEXT