Quinton de Kock
Quinton de Kock esakal
क्रीडा

टीम इंडियासाठी खूष खबर तर दक्षिण आफ्रिकेची वाढली चिंता

अनिरुद्ध संकपाळ

केप टाऊन : भारत आणि दक्षिण आफ्रिका (South Africa vs India) यांच्यातील पहिल्या कसोटीत भारताने तिसऱ्या दिवशी आपले वर्चस्व निर्माण केले. भारताने पहिल्या डावात १३० धावांची आघाडी घेतली. भारताने (India) दुसऱ्या डावात १ बाद १६ धावा केल्याने आता ही आघाडी १४६ धावांपर्यंत पोहचली आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिका संघ अडचणीत सापडला आहे. मालिकेतील पहिल्याच सामन्यात पिछाडीवर पडलेल्या आफ्रिकेची क्विंटन डिकॉकच्या (Quinton de Kock) निर्णयाने चिंता अजून वाढली आहे.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना ३ जानेवारीपासून सुरु होत आहे. मात्र या कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा (South Africa National Cricket Team) अव्वल फलंदाज आणि विकेट किपर क्विंटन डिकॉक खेळणार नाही. क्विंटन डिकॉक दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीत खेळणार नाही. क्विंटन डिकॉक (Quinton de Kock) या काळात पितृत्वाच्या सुट्टीवर (Paternity Leave) जाणार आहे. डिकॉकची पत्नी लवकरच एका बाळाला जन्म देणार आहे. क्विंटन डिकॉक आपल्या पहिल्या बाळाच्या जन्मावेळी तेथे उपस्थित राहणार आहे. त्यामुळे तो दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीत खेळणार नाही.

भारताविरुद्धची (Indian Cricket Team) कसोटी मालिका सुरु होण्यापूर्वीच क्विंटन डिकॉक तिसऱ्या कसोटीला मुकणार अशी चर्चा सुरु होती. मात्र पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी समालोचकांनी डिकॉक दुसऱ्याही कसोटीला मुकणार असल्याची माहिती दिली. यामुळे आफ्रिका संघाच्या चिंचेत भर पडली आहे. आधीच पहिल्या कसोटीत भारतीय गोलंदाज टॉपवर आहे. त्यात पुढच्या कसोटीत त्यांचा दर्जेदार फलंदाज जो एकहाती सामन्याचा निकाल बदलण्याची क्षमता ठेवतो तोच उपलब्ध असणार नाही.

क्विंटन डिकॉकने (Quinton de Kock) दक्षिण आफ्रिकेकडून आतापर्यंत ५३ कसोटी सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने ८९ डावात ३९.१ च्या सरासरीने ३ हजार २४५ धावा ठोकल्या आहेत. डिकॉकने कसोटीत आतापर्यंत ६ शतके आणि २२ अर्धशतके केली आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tech Layoffs : यंदाचं वर्ष ठरतंय 'लेऑफ'चं.. एप्रिलपर्यंत टॉप टेक कंपन्यांनी 70,000 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना पाठवलं घरी!

कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरुन PM मोदींचा फोटो काढला! आरोग्य मंत्रालयाने का घेतला निर्णय?

Mumbai Loksabha: वर्षा गायकवाडांना निवडणूक जाणार कठीण? या कारणामुळे नसीम खान नाराज

Goldy Brar: गोल्डी ब्रार जिवंत! कॅलिफोर्नियात मारलेली व्यक्ती दुसरीच; अमेरिकन पोलिसांचा खुलासा

Latest Marathi News Live Update : 10 नक्षलवाद्यांच्या मृतदेहांसह शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त

SCROLL FOR NEXT