r ashwin can replace axar patel or shardul thakur in world cup 2023 squad team india 
क्रीडा

Team India : अश्विनच्या 'गुगली'त अडकले रोहित शर्मा अन् राहुल द्रविड, वर्ल्डकपमध्ये कोणाचा पत्ता होणार कट?

Kiran Mahanavar

Team India World Cup 2023 Squad R Ashwin : बीसीसीआयने वर्ल्डकप 2023 साठी भारतीय संघाची घोषणा केली आहे, पण 28 सप्टेंबरपर्यंत प्रत्येक संघाला कोणते बदल करायचे असतील करू शकतात. अशा परिस्थितीत आता स्टार ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनला वर्ल्डकप संघात स्थान मिळू शकते, अशी चर्चा सुरू झाली आहे. आता अश्विनची जागा कोणता खेळाडू घेणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे.

सध्या अक्षर पटेलच्या दुखापतीनंतर अश्विनला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत स्थान मिळाले आहे. आशिया कपदरम्यान अक्षरला दुखापत झाली होती त्यामुळे तो संघाबाहेर आहे. येत्या काही दिवसांत अक्षर फिट झाला तर वर्ल्डकपच्या संघात त्याचे स्थान निश्चित आहे, पण सध्या अश्विनची कामगिरी पाहता आणखी एक खेळाडू आहे ज्यांचा पत्ता संघातून कट होऊ शकतो.

बीसीसीआयने वर्ल्डकप 2023 साठी संघाची घोषणा केली तेव्हा संघात ऑफस्पिनर नव्हता. संघात फक्त रवींद्र जडेजा, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव हे तीन फिरकीपटू आहेत, पण डावखुऱ्या फलंदाजांना अडचणीत आणण्यासाठी एक पण उजव्या हाताचा ऑफस्पिनर संघात नाही. अशा परिस्थितीत आशिया कपदरम्यान अक्षर दुखापत झाल्यावर भारताने लगेचच वॉशिंग्टन सुंदरला बोलावले आणि त्याला थेट संघात स्थान देण्यात आले.

आता जेव्हा भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात मालिका खेळत आहे, तेव्हा भारताने सुंदरसह अश्विनचा संघात समावेश केला, पण अनुभवामुळे अश्विनला सुंदरच्या आधी प्लेइंग 11 मध्ये संधी दिली.

पहिल्या एकदिवसीय सामन्यात अश्विनची कामगिरी निराशाजनक होती, मात्र दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने ज्या प्रकारे कामगिरी केली ती अप्रतिम होती. अश्विनने 7 षटकात 41 धावा देत 3 मोठ्या विकेट घेतल्या. होळकर स्टेडियमवर जिथे फलंदाज गोलंदाजाची चांगली धुलाई करत होते. तिथे अश्विनने 6 पेक्षा कमी इकॉनॉमीवर धावा दिल्या.

अश्विनची कामगिरी आणि वर्ल्डकप संघात ऑफस्पिनरची कमतरता लक्षात घेता अक्षर पटेलशिवाय शार्दुल ठाकूरलाही संघातून वगळले जाऊ शकते, अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात सुरू झाली आहे.

शार्दुल ठाकूरला अष्टपैलू म्हणून वर्ल्डकप संघात स्थान मिळाले आहे. गोलंदाजीसोबतच तो आठव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासही सक्षम आहे. पण भारतातील त्याच्या कामगिरीचा विचार केला तर ती काही खास राहिली नाही. वर्ल्डकप 2019 नंतर शार्दुलने मायदेशात 17 सामन्यांत केवळ 20 विकेट्स घेतल्या आहेत, तर या काळात त्याची भारतातील फलंदाजीची सरासरीही 21.50 इतकी आहे.

भारतातील शार्दुलचा विक्रम पाहता संघ व्यवस्थापनाला अश्विनला संघात आणायचे असेल तर शार्दुल ठाकूरचा पत्ता कट होऊ शकतो, असे बोलले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramraje Naik-Nimbalkar: नार्को चाचणी त्यांची त्यांनीच करावी: रामराजे नाईक-निंबाळकर; एकाही घटनेच्या मागे मी आहे, सिद्ध करून दाखवा

तुम्हाला अतिवृष्टीची भरपाई मिळाली नाही का? शेतकऱ्यांनी ‘येथे’ तातडीने काढावा फार्मर आयडी; सोलापूर जिल्ह्यातील ४.९० लाख शेतकऱ्यांना ४९८ कोटींची भरपाई अजूनही मिळाली नाही

७ नोव्हेंबरपासून मुंबईला दररोज विमान! डिसेंबरमध्ये गोव्यालाही सोलापुरातून दररोज विमान; गृह विभागाकडून मिळेना पोलिसांचे मनुष्यबळ, पोलिस ठाण्याचाही प्रस्ताव धुळखात

अग्रलेख : पाणी वाहते झाले...

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात १५ मिनिटांत बनवा ओट्स अन् एग ऑमलेट,सोपी आहे रेसिपी

SCROLL FOR NEXT