R Ashwin esakal
क्रीडा

अश्विनने रवी शास्त्रींबाबत केले मोठे विधान

अनिरुद्ध संकपाळ

भारताचा अव्वल ऑफस्पिनर आर. अश्विनने (R Ashwin) भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्याबद्दल एक मोठे वक्तव्य केले. इएसपीएन क्रिकइन्फोला दिलेल्या मुलाखतीत अश्विनने सांगितले की, रवी शास्त्रींच्या एका वक्तव्यामुळे बसमधून बाहेर फेकून दिल्याची भावना माझ्या मनात निर्माण झाली. यामुळे मी पूर्णपणे उद्ध्वस्त झालो होतो.

रविचंद्रन अश्विनला इएसपीएन क्रिकइन्फोने घेतलेल्या एका मुलाखतीत विचारले की ज्यावेळी रवी शास्त्री यांनी 2019 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कुलदीप यादवला (Kuldeep Yadav) भारताचा क्रमांक एकचा फिरकीपटू म्हणून संबोधले त्यावेळी तुला कसे वाटले असे विचारण्यात आले. कुलदीप यादवने सिडनी कसोटीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 विकेट घेतल्या होत्या. अश्विन या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाला 'मी रवी भाईंचा (Ravi Shastri) खूप आदर करतो. आम्ही सर्वच जण करतो. मला हे ही माहीत आहे की सर्वजण काही ना काही बोलत असतात. त्यावर आपण प्रतिक्रियाही देत असतो. त्या क्षणाला मला उद्ध्वस्त झाल्यासारखे वाटले होते.'

अश्विन (R Ashwin) पुढे म्हणाला की, 'आम्ही सर्वजण संघसहकाऱ्याच्या यशाचा आनंद कसा साजरा करायचा याची चर्चा करत असतो. मी कुलदीपसाठी खूप आनंदी होतो. मी देखील यापूर्वी चांगली गोलंदाजी केली होती. पण ऑस्ट्रेलियात मला पाच विकेट घेणे जमले नव्हते. त्यामुळे मी कुलदीपसाठी आनंदी होतो. आम्ही ऑस्ट्रेलियाला (Australia) मात दिली होती. त्यामुळे तो एक खूप चांगला क्षण होता.'

'पण मला त्यांच्या आनंदात संघाच्या यशात सहभागी होण्यासाठी आधी मी त्या संघाचा भाग असल्यासारखे वाटणे गरजेचे आहे. जर माझ्या मनात बसमधून बाहेर फेकून दिल्यासारखी भावना असेल तर मी कसा काय त्या पार्टीत सहभागी होऊ शकेन आणि ती पार्टी एन्जॉय करु शकेल?' असे असले तरी अश्विन त्या पार्टीत गेला होता. श्विन म्हणाला की, 'मी माझ्या रूममध्ये गेलो आणि माझ्या पत्नीशी बोलला. माझी मुलेदेखील तेथे होती. मग आम्ही ठरवले की या गोष्टीला फारसे महत्व द्यायचे नाही. त्याकडे दुर्लक्ष करायचे. मी पार्टीला गेलो कारण शेवटी आम्ही मालिका जिंकली होती.'

अश्विनने मालिकेतील पहिल्या कसोटीत भारताच्या विजयात महत्वाचा वाटा होता. अश्विन (R Ashwin) याबाबत बोलताना म्हणाला 'पहिली कसोटी माझ्यासाठी चांगल्या आठवणी घेऊन आली. मी पहिल्या डावात पहिल्या चारमधील तीन विकेट घेतल्या. दुसऱ्या डावात विकेट फ्लॅट झाल्यानंतर मी 50 पेक्षा जास्त षटके टाकून 3 विकेट घेतल्या. त्यावेळी मी दुखापतग्रस्त होतो.'

2018 ते 2020 दरम्यान अनेकवेळा खेळ सोडण्याचा आला विचार

अश्विनने आपल्या कराकिर्दितील 2018 ते 2020 या काळात अनेकवेळा खेळ सोडून देण्याचा विचार आल्याचे सांगितले. तो म्हणाला 'मी खूप जोर लावत होतो. पण म्हणावी तशी कामगिरी होत नव्हती. मला दुखापतीने ग्रासले होते. मी सहा चेंडू टाकले तरी मला दम भरायचा. सर्व शरीर दुखायचे. माझा गुडघा दुखायला लागल्यामुळे मी गोलंदाजी करताना फार उंच उडी मारत नव्हतो. त्यामुळे मला आता पोटातून, खांद्यातून ताकद लावावी लागत होती. सहा चेंडू टाकले की मला थांबावे असे वाटत होते.'

यादरम्यान, विदेशातील कामगिरीवरून होणाऱ्या टीकेबाबत अश्विन (R Ashwin) म्हणाला, 'ज्यावेळी त्यांना वैयक्तीकरित्या फटका बसतो त्यावेळी त्यांना दुसराही त्या स्थितीतून गेल्यावर त्याच्याबद्दल सहानभूती वाटते. सहानभूती ही त्याची तुम्हाला ही झळ पोहचल्यावरच येते. माझी अशी भावना आहे की क्रिकेट विश्वात सहानभूतीची कमतरता आहे.'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

J&K Bus Accident : जम्मू-काश्मीरमध्ये खोल दरीत बस कोसळली; 4 जवान ठार, ३१ जखमी

Mukesh Ambani यांनी खरेदी केलं १००० हून अधिक कोटीचं विमान; देशात असं Jet कोणाकडेच नाही; काय आहे खास?

Mumbai News: भर रस्त्यात महिलेला प्रसूतीकळा; ताडपत्री अन् बॅनरच्या मदतीने पोलिसांनी साधलं प्रसंगावधान

Yashasvi Jaiswal ने सुनील गावसकरांचा विक्रम मोडला, सर डॉन ब्रॅडमन यांच्या पंगतीत जाऊन बसला

Mumbai Senate Election: मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित; सुप्रिया सुळेंची सडकून टीका

SCROLL FOR NEXT