Ashwin on Sarfaraz Khan Selection  esakal
क्रीडा

Ashwin on Sarfaraz Khan : सर्फराज खानच्या प्रकरणात अश्विनची उडी; म्हणतो आता तो कशाचीच...

अनिरुद्ध संकपाळ

Ashwin on Sarfaraz Khan Selection : रणजी ट्रॉफीच्या गेल्या दोन हंगामात मुंबईचा मधल्या फळीतील फलंदाज सर्फराज खानने धावांचा आणि शतकांचा पाऊस पाडला आहे. मात्र सर डॉन ब्रॅडमन स्टाईलने कामगिरी करून देखील भारतीय कसोटी संघाची दारे त्याच्यासाठी अद्याप उघडलेली नाहीत. याबाबत अनेक माजी क्रिकेटपटूंनी आपले मत व्यक्त केले आहे. अनेकांनी तर निवडसमितीला धारेवर देखील धरले. आता या सर्व प्रकरणात भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने उडी घेतली आहे.

आर. अश्विनने आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्फराज खानबद्दल मत व्यक्त केले. अश्विन म्हणाला की, 'मी सर्फराज खानबद्दल कुठून बोलायला सुरू करू हेच कळत नाहीये. त्याच्या निवडीबद्दल कोणत्याही प्रकारचा वाद विवाद होता कामा नये. मात्र आता त्याला संघात निवड होतेय की नाही याबाबत काहीच फरक पडत नाहीये. तुम्ही बघा त्याने 2019 - 20 च्या हंगामात 900 धावा केल्या. आता 2021 - 22 च्या हंगामात देखील 900 पेक्षा जास्त धावा ठोकल्या आहे. आता तो या सर्व वादांच्या मुद्यांपासून पुढे गेला आहे.

अश्विन पुढे म्हणाला की, 'या हंगामात त्याने खोऱ्याने धावा केल्या आहेत. त्याने आपली कामगिरी सिद्ध करून दाखवली आहे. तुम्ही पहा त्याची सरासरी 100 पेक्षा जास्त आहे. गेल्या तीन हंगामात त्याचा स्ट्राईक रेट 100 पेक्षा जास्त आहे. सर्फराज सातत्याने टीम इंडियाचा दरवाजा ठोठावत आहे. तो संघात निवड होण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. सध्या जरी त्याची निवड होत नसली तरी तो लवकरच भारतीय संघात निवडला जाईल. दिल्लीविरूद्ध त्याने जबरदस्त फलंदाजी केली होती.'

(Sports Latest News)

हेही वाचा : T+1 Settlement मुळे वाढेल शेअर बाजारातली उलाढाल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Gokul Election 2026 : 'गोकुळ'च्या सत्ताकारणाचा काउंटडाऊन सुरू! अंतिम मतदार यादीची तारीख ठरली; उमेदवारी अर्जाचा मुहूर्तही निश्चित, 410 संस्थांच्या हरकतीवर सुनावणी

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : कात्रज घाटात भाजपशी संबंधित निवडणूक साहित्याचा खच; स्वच्छता ग्रुपकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT