Rachin Ravindra esakal
क्रीडा

Rachin Ravindra : रचिन नावाशी राहुल - सचिनचा खास संबंध; भारतीय वंशाच्या फलंदाजानं गतविजेत्यांना चांगलंच ठोकलं

अनिरुद्ध संकपाळ

Rachin Ravindra : भारतात होत असलेल्या वनडे वर्ल्डकप 2023 च्या पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडच्या दोन फलंदाजांनी शतकी खेळी करत धमाका केला. डेवॉन कॉन्वे हा यंदाच्या वर्ल्डकपमध्ये शतक ठोकणारा पहिला फलंदाज ठरला. विशेष म्हणजे भारतीय वंशाच्या रचिन रविंद्रने देखील शतकी खेळी केली.

इंग्लंडच्या 283 धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडला दुसऱ्याच षटकात पहिला धक्का बसला होता. सॅम करनने सलामीवीर विल यंग शुन्यावर बाद केले. मात्र त्यानंतर कॉन्वे आणि रचिनने दुसऱ्या विकेटसाठी नाबाद 200 धावांची भागीदारी रचली. कॉन्वेने आक्रमक तर रचिनने बॉल टू रन धावा करत इंग्लंडच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला.

भारतीय वंशाचा रचिन जरी न्यूझीलंडकडून खेळत असला तरी त्याचं भारताच्या दिग्गज माजी खेळाडू राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकर या नावांशी खास संबंध आहे. रचिनचे वडील हे मुळचे बंगळुरूचे आहेत. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनियर असलेल्या रचिनच्या वडिलांनी न्यूझीलंडमध्ये स्थायिक होण्याचा निर्णय घेतला.

रचिनच्या वडिलांचे सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड हे आवडते क्रिकेटपटू आहेत. त्यामुळे त्यांनी आपल्या मुलाचे नाव राहुलचं र आणि सचिनचं चिन घेत रचिन असं ठेवलं. आता हाच रचिन भारतात शतक ठोकून या दिग्गजांचं लक्ष वेधून घेत आहे.

रचिन हा अष्टपैलू खेळाडू असून तो डावखुरी फलंदाजी आणि फिरकी गोलंदाजी देखील करतो. म्हणूनच त्याची भारतात होणारा वर्ल्डकप खेळण्यासाठी न्यूझीलंडच्या संघात वर्णी लागली.

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या फिरकीपटूंनी आपल्या कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवत बलाढ्य फलंदाजी लाभलेल्या इंग्लंडला 282 धावात रोखलं.

इंग्लंडकडून जो रूटने सर्वाधिक 77 तर कर्णधार बटलरने 43 धावांचे योगदान दिले. विशेष म्हणजे इंग्लंडच्या संघातील सर्व 11 खेळाडूंनी दुहेरी आकडा गाठला. न्यूझीलंडकडून मॅट हेन्रीने 3 तर सँटनर आणि ग्लेन फिलिप्स यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. ग्लेन फिलिप्स हा त्यांचा पार्ट टाईम गोलंदाज आहे.

(World Cup Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Goa Highway: 'मुंबई-गोवा'वर कोंडी; मे महिना संपत आला पण कामं अपूर्णच

Free Education: JEE-NEET साठी आता मोफत कोचिंग! घरबसल्या IIT प्रोफेसर्सकडून फ्रीमध्ये शिका; जाणून घ्या कुठे?

'मृणालने अमेरिकेत बाळाचा एकटीनं सांभाळ केला' काव्याने सांगितला नंदिनीच्या खऱ्या आयुष्यातील गरोदरपणातील अनुभव, म्हणाली...

Interfaith Blood Donation: बकरी ईद निमित्त मशिदीत सर्वधर्मीयांचे रक्तदान; ‘मानवता हाच खरा धर्म’चा संदेश

Latest Marathi News Live Update : इंदापूर तालुक्यातील प्रश्न पेटला, कृषिमंत्री निघून गेल्यानंतरही शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच

SCROLL FOR NEXT