Rafael Nadal | Alexander Zverev  Sakal
क्रीडा

French Open: नदालच्या बालेकिल्ल्यात झ्वेरेवचा डंका! लालमातीच्या बादशाहचा दोन दशकात चौथाच पराभव

Rafael Nadal: 14 वेळचा फ्रेंच ओपन विजेता राफेल नदालला यावर्षी पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. पराभवानंतर नदाल भावुक झाला होता.

Pranali Kodre

Rafael Nadal: फ्रेंच ओपन 2024 स्पर्धेला रविवारी (26 मे) सुरुवात झाली. या स्पर्धेत स्पेनचा दिग्गज टेनिसपटू राफेल नदालही सामील झाला होता. नदालला फ्रेंच ओपनचा अनिभिषिक्त सम्राट समजले जाते. मात्र, नदालला यावर्षी या स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत पराभवाचा मोठा धक्का बसला.

फ्रेंच ओपन 2024 मध्ये नदालचा पहिलाच सामना चौथ्या मानांकित साशा झ्वेरेवविरुद्ध झाला. या सामन्यात झ्वेरेवने नदालला 6-3, 7-6(7-5), 6-3 अशा सरळ तीन सेटमध्ये पराभूत केले. गेल्या दोन दशकातील हा नदालचा या स्पर्धेतील फक्त चौथा पराभव आहे.

खरंतर गेल्या वर्षभरापासून नदाल दुखापतीने त्रस्त आहे. त्याला शस्त्रक्रियाही करून घ्यावी लागली आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरात त्याला अनेक स्पर्धांनाही मुकावे लागले.

त्याने नुकतेच टेनिस कोर्टवर पुनरागमन केले होते. त्यानंतर तो फ्रेंच ओपनमध्ये सामील झाला होता. मात्र दुखापतीतून सावरून नुकतेच पुनरागमन करणाऱ्या नदालला. पहिल्या फेरीत बाहेर जावे लागले आहे.

या सामन्यात पहिल्या सेटमध्ये झ्वेरेवने सहज विजय मिळवल्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये नदालने पुनरागमनाचा प्रयत्न केला. मात्र टायब्रेकरमध्ये झ्वेरेवने बाजी मारली. तिसरा सेटही झ्वेरेव सहज जिंकला. दरम्यान, सामना जिंकल्यानंतरही झ्वेरेवने नदालप्रती खिलाडूवृत्ती दाखवत त्याला सन्मान देत जोरदार सेलिब्रेशन केलं नाही.

भावुक झाला नदाल

दरम्यान 14 वेळा फ्रेंच ओपन जिंकणारा नदाल पराभवानंतर भावुक झाला होता. सध्या अशी चर्चा आहे की यंदा नदाल फ्रेंच ओपनमध्ये अखेरचा खेळला आहे.

याबाबत सामन्यानंतर बोलताना नदाल म्हणाला, 'माझ्यासाठी व्यक्त होणे कठीण आहे. मला माहित नाहीये की हे शेवटचे आहे की नाही, मी पुन्हा खरंच तुमच्या सर्वांसमोर असेल की नाही. मला 100 टक्के खात्री नाही. पण जर हे शेवटचे असेल, तर मी त्याचा आनंद घेतला.'

'मी तयारी करताना मला प्रेक्षकांकडून गेल्या आठवडाभरात खूप चांगला पाठिंबा मिळाला. आत ज्या काही भावना उंचबळून आल्यात त्यांना शब्दात मांडणे कठीण आहे. पण लोकांचे प्रेम माझ्यासाठी स्पेशल आहे.'

लाल मातीचा बादशाह

नदालला लाल मातीचा बादशाह असं म्हटलं जातं. कारण त्याने तब्बल 14 वेळा फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकली आहे. झ्वेरेवविरुद्धचा त्याचा या स्पर्धेतील 116 वा सामना होता. विशेष म्हणजे या 116 सामन्यात त्याने केवळ चौथ्यांदा पराभव स्विकारला.

तसेच नदालला फ्रेंच ओपनमध्ये पराभूत करणारा झ्वेरेव केवळ तिसरा टेनिसपटू आहे. यापूर्वी त्याला दोन वेळा नोवाक जोकोविच आणि एक वेळा रॉबिन सॉडर्लिंगने पराभूत केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rekha Gupta : दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर जीवघेणा हल्ला, जनता दरबार सुरु असताना हल्लेखोर आला अन्...

Satara Rain update:'कराड-पाटण तालुक्यात मुसळधार; कराड-चिपळूण मार्ग वाहतूक बंद, अडकलेले कोकणात जाणारे 150 प्रवासी एसटी बसमधून रवाना

HDFC Bank Alert: HDFC ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; बँकेच्या अत्यावश्यक सेवा दोन दिवस बंद राहणार

Pune Rain Update: पुण्यात पावसाचा हाहाकार! एकता नगरमध्ये पाणी शिरलं, खडकवासल्यातून विसर्ग वाढला

Rain-Maharashtra Latest live news update: पावसाचा कहर! वरंधा घाटात दरड कोसळली

SCROLL FOR NEXT