क्रीडा

नदालनंतर नाओमीची विम्बल्डनमधून माघार; ऑलिम्पिकमध्ये खेळणार

सूरज यादव

नदालने सोशल मीडियावरून माहिती देताना म्हटलं की, टोक्यो ऑलिम्पिक आणि विम्बल्डनमध्ये खेळणार नाही.

न्यूयॉर्क - स्पेनचा टेनिस स्टार राफेल नदालने दोन मोठ्या स्पर्धांमधून माघार घेतली आहे. तर फ्रेंच ओपनमध्ये पहिल्यांदा माघार घेतल्याची घोषणा करणारी नाओमी ओसाका हिनेसुद्धा विम्बल्डन खेळणार नसल्याचं सांगितलं आहे. नदालने टोक्यो ऑलिम्पिक आणि विम्बल्डनमधून तर ओसाकाने विम्बल्डनमधून माघार घेतली आहे. नदालने सोशल मीडियावरून घोषणा करताना म्हटलं की, टोक्यो ऑलिम्पिक आणि विम्बल्डनमध्ये खेळणार नाही. फ्रेंच ओपनमध्ये सेमीफायनलला नदालला जोकोविचकडून पराभव पत्करावा लागला होता. आपल्याला हा निर्णय घेणं सोपं नव्हतं असंही नदालने म्हटलं आहे.

सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये नदालने म्हटलं की, विम्बल्नडन आणि टोक्यो ऑलिम्पिकमध्ये मी न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेणं माझ्यासाठी आजिबात सोपं नव्हतं. माझ्या प्रकृतीची स्थिती पाहता आणि टीमसोबत चर्चा केल्यानंतर हा कठीण निर्णय घेण्याची हीच योग्य वेळ आहे.

जपानची टेनिस स्टार नाओमी ओसाकाने आपण वैयक्तिक कारणास्तव विम्बल्डनमध्ये सहभागी होत नसल्याचं सांगितलं आहे. तिने यावेळी म्हटलं की,'विम्बल्डनमधून माघार घेतली असली तरी टोक्यो ऑलिम्पिकमध्ये खेळणार आहे. त्यावर लक्ष केंद्रत करण्याचा निर्णय़ घेतला आहे.' नाओमीला फ्रेंच ओपन स्पर्धेवेळी पत्रकार परिषदेत उपस्थित न राहिल्यानं 15 हजार डॉलर्सचा दंड झाला होता. त्यानंतर तिने अचानक स्पर्धेतूनच माघार घेण्याची घोषणा केली होती. तेव्हा तिने आपण 2018 पासून मानसिक तणावाशी संघर्ष करत असल्याचं म्हटलं होतं.

ऑलिम्पिक स्पर्धा 23 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीत होणार आहे. जपानची राजधानी टोक्योमध्ये ऑलिम्पिक स्पर्धा पार पडणार आहेत. त्याआधी विम्बल्डन स्पर्धा होणार असून वर्षातील तिसरी ग्रँड स्लॅम 28 जून ते 11 जुलै या कालावधीत पार पडेल. त्यानंतर अमेरिकन ओपन ऑगस्ट महिन्यात होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Ground Report: राम सातपुतेंना धक्का बसणार की प्रणिती शिंदेंना? वंचित गेम चेंजर ठरणार...ग्राऊंड रिपोर्ट वाचा...

जे कुटुंबाला सांभाळू शकत नाहीत ते महाराष्ट्राला काय सांभाळणार?; PM मोदींची पवारांवर कडवट टीका

Gurucharan Singh : गुरुचरण सिंहने रचलाय बेपत्ता असल्याचा कट ? ; पोलिसांनी व्यक्त केला संशय

Suryakumar Yadav: भारताचा 'मिस्टर 360' सूर्यानं 'बेबी एबी'ला शिकवला कसा खेळायचा सुपला शॉट, पाहा Video

Latest Marathi News Live Update : "चित्रा वाघ यांनी माझी माफी मागावी," अनभिनेते राज नयानी यांचा इशारा

SCROLL FOR NEXT