Rafael Nadal  esakal
क्रीडा

Rafael Nadal : टेनिस कोर्टवरील शांतता झाली भंग... अखेर 'बादशाह' 349 दिवसांनी परतला!

अनिरुद्ध संकपाळ

Rafael Nadal : अखेर राफेल नदाल टेनिस कोर्टवर परतला! 22 ग्रँडस्लॅम जिंकणारा चॅम्पियन राफा जवळपास वर्षभरानंतर टेनिस कोर्टवर परतला असून ब्रिसबेनच्या टेनिस चाहत्यांनी त्याचं पुनरागमन जल्लोषात साजरं केलं. ज्यावेळी राफेल नदाल आपल्या शेवटच्या ग्रँडस्लॅम खेळत आहे. गेल्या ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत दुखापतीमुळे तो राऊंड ऑफ 64 मध्येच बाहेर पडला होता. त्यानंतर त्याचे रँकिंग 672 स्थानापर्यंत घसरले.

दरम्यान, राफेल नदाल दुखापतीतून सावरत पुन्हा एकदा ब्रिसबेनच्या टेनिस कोर्टवर अवतरला. त्यावेळी चाहत्यांनी त्याचे टाळ्यांच्या गजरात आणि स्टँडिग ओवेशन देत स्वागत केलं. नदालने देखील चाहत्यांच्या प्रेमाने भारावून गेला. त्याने हात उंचावत चाहत्यांच्या प्रेमाला दाद दिली.

राफेल नदाल त्याच्या कारकिर्दीतील शेवटचे वर्ष आहे. तो आपली शेवटची 4 ग्रँडस्लॅम स्पर्धांची मोहीम ऑस्ट्रेलियन ओपनपासून सुरू करत आहे.

राफेल नदालचा सामना हा धडाकेबाज डॉमिनिक थिइम सोबत होता. या सामन्यात राफेलने डॉमिनिकचा 7 - 5, 6 - 1 असा पराभव केला. नदाल आणि डॉमिनिक द्वंद्वात नदाल 10 - 6 ने आघाडीवर आहे. मात्र हार्ड कोर्टचा विचार केला तर डॉमिनिक नदालवर भारी पडताना दिसत होता. त्याने 2 - 1 अशी आघाडी घेतली होती. यात ऑस्ट्रेलियन ओपन 2020 मधील चार सेट चाललेल्या सामन्याचा देखील समावेश आहे. आता ही आघाडी 2 - 2 अशी बरोबरीत राहिली आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

खरातशी संबंधित मालमत्ता बड्या अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांच्या नावे, ईडीचा ससेमिरा मागे लागणार; सरकारी बाबूंचे धाबे दणाणले

US-Iran War: ''रात्रीतून सगळं संपेल...'' इराणसोबतच्या बैठकीवरुन अमेरिकेचं मोठं विधान

Chhatrapati Sambhajinagar: भामट्यांनी दोन दिवसांत हिसकावले तिघींचे मंगळसूत्र; सांगा, रात्री घराबाहेर जाणे टाळावे का?

Chhatrapati Sambhajinagar: उभ्या ट्रकला आयशर धडकला; वडोद बाजार फाट्यावरील घटना; चालक गंभीर जखमी

महाराष्ट्राला उष्णतेच्या लाटेचा इशारा, अकोला जगात सर्वात उष्ण शहर, टॉप १५ मध्ये राज्यातली पाच शहरं

SCROLL FOR NEXT