Rafael Nadal  sakal
क्रीडा

इंजेक्शन घेऊन टेनिस कोर्टवर उतरला अन्‌ फ्रेंच ओपन जिंकला

नदालचा विम्बल्डन सहभाग अनिश्‍चित?

सकाळ ऑनलाईन टीम

Rafael Nadal won a 14th French Open: या वर्षी जबरदस्त फॉर्ममध्ये असणारा स्पेनचा महान टेनिसपटू राफेल नदाल याचा २७ जूनपासून सुरू होणाऱ्या विम्बल्डन या मानाच्या ग्रँड स्लॅममधील सहभाग अनिश्‍चित आहे. ऑस्ट्रेलियन व फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकल्यानंतर नदालकडून विम्बल्डन जेतेपदाची आशा बाळगली जात आहे; पण प्रत्यक्षात नदालसाठी ही आव्हानात्मक बाब असणार आहे. फ्रेंच ओपनमधील लढतीत तो इंजेक्शन घेऊन कोर्टवर उतरत होता. अशा परिस्थितीतही त्याने ही स्पर्धा जिंकली. आता तो दुखापतीवर उपचार घेणार आहे.

नदालने २००८ व २०१० मध्ये विम्बल्डन स्पर्धेच्या जेतेपदावर मोहोर उमटवली आहे. याप्रसंगी नदाल म्हणाला, विम्बल्डन टेनिस स्पर्धेवर माझे प्रेम आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी व्हायला नक्कीच आवडेल; पण दुखापतीवर जे उपचार केले जाणार आहेत, त्यावर सर्व काही अवलंबून आहे. जर माझ्या शरीराने साथ दिली, तर नक्कीच विम्बल्डनमध्ये सहभागी होईन, असेही तो विश्‍वासाने म्हणाला.

दृष्टिक्षेपात

  • फ्रेंच ओपनमधील काही लढतीआधी नदाल डाव्या पायामध्ये इंजेक्शन घेत होता

  • स्पेनमध्ये पोहोचल्यानंतर दुखापतीवर उपचार घेणार

  • शस्त्रक्रियेची गरज भासल्यास कारकीर्द संपुष्टात येण्याची शक्यता

पुन्हा इंजेक्शन घेऊन खेळणार नाही

नदाल आगामी दिवसांमध्ये दुखापतीवर उपचार घेणार आहे. याप्रसंगी तो म्हणाला, की माझ्या दुखापतीवर उपचार करण्यात येणार आहेत. त्यातून मी बरा झालो, तर नक्कीच विम्बल्डनमध्ये सहभागी होईन; पण इंजेक्शन घेऊन पुन्हा टेनिस कोर्टवर उतरणार नाही, असेही त्याने या वेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'मला पोलिसात न्या, तिथं बघतोच तुम्हाला, माझा बाप...' नशेत धुंद मनसे नेत्याच्या लेकाची इन्फ्लुएन्सरला शिवीगाळ, VIDEO VIRAL

Pune News: शिक्षकांचे आंदोलन सुरू, पण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही,शाळा ८, ९ जुलैला बंद राहणार नाहीत, शिक्षण विभाग

Sangli Muharram: 'हिंदू-मुस्लिम ऐक्याची दीडशे वर्षांची परंपरा'; गगनचुंबी ताबुतांच्या कडेगावात गळाभेटी

Viral Video: अप्पाचा विषय लय हार्डय ! जीम ट्रेनर समोर आजोबांनी मारले जोर पण टोपी पडली नाही... पाहा अनोख्या कौशल्याचा व्हिडिओ

'ही प्राडाची नाही... ओरिजनल कोल्हापुरी आहे'; Prada ला टोला लगावत अभिनेत्री करिना कपूर 'कोल्हापुरी चप्पल'बाबत काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT