Rahkeem Cornwall Run Out esakal
क्रीडा

Rahkeem Cornwall Run Out : इतका निवांतपणा बरा नाही! क्रिकेटच्या इतिहासात असा रन आऊट कधी झाला नाही

अनिरुद्ध संकपाळ

Rahkeem Cornwall Run Out : वेस्ट इंडीजचा राहकीम कॉर्नवेल हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात हेवीवेट क्रिकेटपटू म्हणून ओळखला जातो. तो सध्या कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये खेळत आहे. बार्बाडोस रॉयल्सकडून खेळणाऱ्या कॉर्नवेलचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

वेस्ट इंडीजचा हा अष्टपैलू खेळाडू खूप विचित्र पद्धतीने धावबाद झाला. क्षेत्ररक्षकाने मिसफिल्डिंग करूनही कॉर्नवेल आपली धाव पूर्ण करू शकला नाही. विशेष म्हणजे तो डावाच्या पहिल्याच चेंडूवर बाद झाला. बार्बाडोस रॉयल्स 201 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत होते. कॉर्नवेलला माहिती होतं की त्याच्या संघाला वेगाने धावा करणे गरजेचे आहे. मात्र त्याची धाव तितकी वेगवान नव्हती.

कॉर्नवेल हा कायमच त्याच्या वजनामुळे चर्चेचा विषय ठरला आहे. अनेक क्रिकेट जाणकार, माजी क्रिकेटपटू आणि तज्ज्ञ यांनी रहकीमला त्याचे वजन नियंत्रणात ठेवण्याचा सल्ला दिला आहे. रहकीमने दावा केला आहे की तो योग्य आहार घेतोय मात्र तरी देखील आपले वजन नियंत्रणात रहात नाही.

कॉर्नवेल इएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना म्हणाला होता की, 'मी माझ्या शरिराची ठेवण बदलू शकत नाही. मी खूप उंच किंवा मी खूप वजनदार आहे असं म्हणू शकत नाही. प्रत्येकजण बारीक असू शकत नाही. मी फक्त मैदानावर जाऊन माझ्या गुणवत्तेनुसार खेळण्याचा प्रयत्न करू शकतो.'

'मी खूप वजनदार व्यक्ती आहे यात शंका नाही. मात्र मी कष्ट करतोय. मी त्यामध्ये कोणतीही टाळाटाळ करत नाही. मी माझ्या फिटनेसवर बरेच काम करतोय. मी योग्य आहार घेण्याचा प्रयत्न करतोय.'

बार्बाडोस आणि सर. लुसिया किंग्ज यांच्यातील सामन्यात कॉर्नवेलच्या बार्बाडोस संघाला 202 धावांचे आव्हान पार करताना 147 धावांपर्यंतच मजल मारता आली. कॉर्नवेलने वेस्ट इंडीजकडून कसोटी क्रिकेटमध्ये चांगल्या गोलंदाजीचे प्रदर्शन केले होते. मात्र या सामन्यात त्याने गोलंदाजी केली नाही. फलंदाजीतही त्याला भोपळाही फोडता आला नाही.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SBI Credit Card: SBI क्रेडिट कार्ड वापरताय? 1 तारखेपासून नियम बदलणार; कोणते फायदे मिळणार नाहीत?

Latest Marathi News Updates: फडणवीस वाकड्यात घुसतात, म्हणून मी असं बोलतो – मनोज जरांगे

Hartalika Vrat 2025 Puja Samagri: अखंड सौभाग्यासाठी हरतालिका व्रत; पूजेसाठी लागणारे साहित्य व विधीची संपूर्ण माहिती वाचा एकाच क्लिकवर!

Dada Bhuse : महायुतीचा निर्णय शिंदे घेतील; पण आतापासूनच निवडणुकीच्या तयारीला लागा: दादा भुसे

Pune Airport : विमानाच्या खिडकीचे आतील आवरण निघाले; पुण्याहून दिल्लीला जाणाऱ्या विमानातील घटना

SCROLL FOR NEXT