Rahul Dravid Birthday sakal
क्रीडा

Rahul Dravid Birthday: 'या रिपोर्टरला बाहेर काढा...', जेव्हा राहुल द्रविड पाकिस्तानमध्ये संतापला

Kiran Mahanavar

Rahul Dravid Birthday : आज भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि विद्यमान प्रशिक्षक राहुल द्रविडचा वाढदिवस आहे. द वॉल या नावाने प्रसिद्ध असलेला द्रविड 50 वर्षांचा झाला आहे. क्रीडा जगतातील दिग्गजांसह चाहत्यांनीही वेगवेगळ्या प्रकारे अभिनंदन केले आहे. 1973 मध्ये इंदूरमध्ये जन्मलेल्या द्रविडची स्वतःची एक वेगळी शैली आहे आणि तो त्याच्या शांत स्वभावासाठी ओळखला जातो.

पण द्रविडलाही राग येतो हे चाहत्यांना माहीत आहे का? राहुल द्रविडला एकदा पाकिस्तान दौऱ्यावर प्रचंड राग आला होता. हा राग पत्रकार परिषदेदरम्यान आला, जेव्हा द्रविडने एका पत्रकाराला बाहेर काढण्यापर्यंत मजल मारली होती.

ही घटना 2004 मध्ये भारतीय संघासोबत पाकिस्तान दौऱ्यावर घडली होती. त्या कसोटी मालिकेत द्रविडची बॅट जबरदस्त बरसली होती. त्याने 3 सामन्यांच्या 4 डावात 309 धावा केल्या. याच पाकिस्तान दौऱ्यावर झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान एका पत्रकाराने मॅच फिक्सिंगबाबत प्रश्न केला होता. यावर टीम इंडियाची भिंत म्हटला जाणारा राहुल द्रविड चांगलाच संतापला. तेव्हा द्रविड जाहीरपणे म्हणाला, 'या रिपोर्टरला कोणीतरी बाहेर काढा. हा मूर्खपणा आहे आणि अशा गोष्टी खेळासाठी वाईट आहेत.

इंग्लंडविरुद्ध आला दुसऱ्यांदा राग

राहुल द्रविडला राग येण्याची ही पहिलीच वेळ आहे, असे नाही. यानंतर 2006 मध्ये एकदा राहुल द्रविड चांगलाच चिडला होता. ही घटना इंग्लंडविरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेदरम्यान घडली. त्या मालिकेत द्रविड संघाचा कर्णधार होता. यादरम्यान इंग्लंडविरुद्धच्या मुंबई कसोटीत भारतीय संघाचा पराभव झाला होता. या पराभवामुळे संतप्त झालेल्या द्रविडने ड्रेसिंग रूममध्ये खुर्ची फेकली. खरे तर त्या विजयासह इंग्लंड संघाला तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधता आली. अशा स्थितीत द्रविडला पराभव सहन झाला नाही आणि तो संतापला.

राहुल द्रविडची क्रिकेट कारकीर्द

  • 164 कसोटी - 13288 धावा - 36 शतके - 63 अर्धशतके

  • 344 वनडे - 10889 धावा - 12 शतके - 83 अर्धशतके

  • 1 टी-20 आंतरराष्ट्रीय सामना - 31 धावा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT