Rahul Dravid Team India e sakal
क्रीडा

इंग्लंडचे मैदान गाजवण्यासाठी द्रविडचा कोहलीला मोलाचा सल्ला

सुशांत जाधव

Indias tour of England : भारतीय संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविड (Rahul Dravid ) याने इंग्लंड दौऱ्यात दमदार कामगिरीसाठी टीम इंडियाला मोलाचा सल्ला दिलाय. विराट कोहलीला प्लेइंग इलेव्हन निवडताना याचा निश्चितच फायदा होईल. भारतीय संघाला इंग्लंडमध्ये धमाकेदार कामगिरी करायची असेल तर अष्टपैलू रविंद्र जडेजा (Ravindra jadeja) आणि आर अश्विन (R Ashwin) या जोडगोळीला एकत्रितपणे प्लेइंग इलेव्हनध्ये खेळवायला पाहिजे, असे राहुल द्रविडने म्हटले आहे. राहुल द्रविडच्या नेतृत्वाखालीच भारतीय संघाने इंग्लंड दौऱ्यावर शेवटची मालिका जिंकली आहे. इंग्लंड विरुद्धच्या मालिकेसाठी अश्विन आणि जडेजा या दोन फिरकीपटूंना राहुल द्रविड यांनी पहिली पसंती दिलीये.

अश्विन आणि जडेजा दोघांना एकत्रितपणे प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळेल का? असा प्रश्न राहुल द्रविड याला विचारण्यात आला होता. यावर ते म्हणाले की, हो नक्कीच. भारतीय संघाला या लाइनअपचा नेहमीच फायदा झालाय. सध्याच्या घडीला अश्विन आणि जडेजा यांच्यामुळे टीममधील ऑल राउंडरचा बॅलन्स उत्तम वाटतो. हार्दिक पांड्या ज्यावेळी बॉलिंग करत नाही त्यावेळी टीम इंडियाकडील जलदगती ऑल राउंडरचा पर्यायच उरत नाही. समर डेजमध्ये खेळपट्टी कोरडी असेल तर भारतीय संघाकडे दोन फिरकीपटूंना खेळवण्याची संधी असेल, असे राहुल द्रविडने म्हटले आहे.

इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत भारतीय संघासाठी टॉस देखील महत्त्वपूर्ण असेल, असे द्रविडने म्हटले आहे. भारतीय संघाने टॉस जिंकला तर दोन स्पिनरसह खेळण्याचा निर्णय घेणं सहज शक्य होईल. पहिल्या तीन दिवसांत खेळपट्टीही जलदगती गोलंदाजांसाठी उत्तम असली तरी चौथ्या पाचव्या दिवशी फिरकीला साथ मिळेल, अशी भविष्यवाणीही द्रविड यांनी केली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रविंद्र जडेजा दुखापतग्रस्त झाला होता. परिणामी तब्बल 4 महिने तो संघाबाहेर होता. या दुखापतमुळे त्याला इंग्लंड विरुद्धच्या मायदेशातील मालिकेतही मुकावे लागले होते. त्याच्या अनुपस्थितीत रविंद्र जडेजाने अष्टपैलू खेळीची कामगिरी बजावली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Farmer Loan Waiver : साताऱ्यातील 31,556 शेतकरी पात्र! अहिल्यादेवी शेतकरी कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी जाहीर; तुमच्या गावातील यादी 'येथे' पाहा

Mumbai Crime: लोक भवनाच्या नावाखाली रेल्वे तिकीट घोटाळा! खोटे शिक्के अन् राज्यपालांची बनावट सही, सूत्रधारासह ३ रेल्वे एजंट अटकेत

8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! फिटमेंट फॅक्टरवर सरकारने पहिल्यांदाच मांडली अधिकृत भूमिका; संसदेत काय सांगितले?

Latest Marathi News Live Update : पुढील चोवीस तासांत विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज

Prashant Kishor: "माझ्याच पोलीस ठाण्यात मला धमक्या, एकदा वर्दी काढली तर..."; SHO अन् प्रशांत किशोर यांच्यात वाद, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT