Rohit Sharma, Rahul Dravid
Rohit Sharma, Rahul Dravid esakal
क्रीडा

रोहित प्रत्येक वेळी उपलब्ध असेलच असं नाही : राहुल द्रविड

धनश्री ओतारी

दक्षिण अफ्रिकेविरुद्ध खेळवण्यात येणाऱ्या ५ सामन्यांच्या टी २० सीरीजसाठी टीम इंडियातील काही खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. यामध्ये टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याच्या नावाचादेखील समावेश आहे. आयपीएलमधील रोहित शर्माचा फ्लॉप खेळ पाहता त्याच्या कर्णधार पदावर अनेक सवाल उपस्थित होत आहेत. अशातच दक्षिण अफ्रिकेविरुद्ध खेळवण्यात येणाऱ्या सीरीजमधून त्याला वगळल्याने रोहितच्या खेळण्यावर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. दरम्यान, टीम इंडियाचा कोच राहुन द्रविडने स्पष्टीकरण दिले आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना राहुन द्रविडने रोहित शर्माला दिलेल्या विश्रांतीवर भाष्य केलं. तो म्हणाला, रोहित शर्मा हा तिन्ही फॉरमॅटचा खेळाडू आहे. प्रत्येकवेळी तो संघात उपलब्ध असेलच असे नाही. आणि तशी अपेक्षा करणदेखील चुकिचे आहे. कधी कधी आम्हाला खेळाडूंना विश्रांती देण भाग पडत.

तसेच, “मी रेकॉर्डबद्दल जास्त विचार करणारा व्यक्ती नाही. जर आम्ही चांगले खेळलो तर आम्ही जिंकू. आम्ही चांगले खेळलो नाही तर पराभव हा आमचा भाग असेल. पण आम्ही पुढे जात राहू. असे स्पष्टीकरण कोच द्रविडने दिले आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी रोहित शर्मा, विराट कोहली, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांना विश्रांती देण्यात आली आहे. त्याचवेळी अष्टपैलू हार्दिक पांड्याने पुनरागमन केले आहे.

या संघाचे नेतृत्व केएल राहुल करणार असून यात ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुड्डा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, व्यंकटेश अय्यर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक यांचा समावेश आहे.

रोहित शर्माच्या अनुपस्थितीत टीम इंडियाची कमान केएल राहुलकडे आहे. यासोबतच निवड समितीने मर्यादित षटकांच्या फॉर्मेटमध्ये ऋषभ पंतकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Bomb Threat: "दादरच्या मॅकडोनाल्डमध्ये बॉम्बस्फोट होणार," पोलीस नियंत्रण कक्षाला आलेल्या फोनमुळे खळबळ

Swati Maliwal: '...तर सिसोदिया आज इथं असते...', आपच्या मोर्चाच्या निर्णयानंतर स्वाती मालीवाल यांचं ट्विट

Simple Hacks: कुलर सुरू असताना पण खोली दमट वाटते? थंडावा निर्माण करण्यासाठी वापरा 'या' ट्रिक्स

Mumbai local: मुंबईत लोकलच्या गर्दीमुळे झालेला मृत्यू अपघातच! जबाबदारी रेल्वे प्रशासनाची, भरपाई देण्याचे कोर्टाचे आदेश, नाहीतर...

Singham Again: श्रीनगरमध्ये सुरुये 'सिंघम अगेन'चं शूटिंग; अजय देवगण आणि जॅकी श्रॉफ यांच्या अॅक्शन सीनचा व्हिडीओ व्हायरल

SCROLL FOR NEXT