Rahul Dravid Statement About KL Rahul  esakal
क्रीडा

KL Rahul : केएल राहुलच्या भविष्याबाबत प्रशिक्षक द्रविडचे मोठे वक्तव्य

अनिरुद्ध संकपाळ

Rahul Dravid Statement About KL Rahul : भारताने आतापर्यंत टी 20 वर्ल्डकपमध्ये सुपर 12 मधील आपले 3 सामने खेळले आहेत. या तीनही सामन्यात सलामीवीर केएल राहुलची कामगिरी अत्यंत खराब राहिली आहे. भारताने जरी आपले पहिले दोन सामने जिंकले असले तरी दक्षिण आफ्रिकेविरूद्धचा सामना भारताने गमावला. भारताचे आता बांगलादेश आणि झिम्बाब्वे यांच्याविरूद्ध होणार आहेत. दरम्यान, उद्या बांगलादेशविरूद्ध होणाऱ्या सामन्यात केएल राहुलला खेळवणार नाही नाही याबाबत शंका निर्माण झाली आहे. यावर संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

बांगलादेशविरूद्धच्या सामन्यापूर्वी प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी राहुल द्रविड यांनी केएल राहुलच्या संघातील भविष्याबाबत एक मोठे वक्तव्य केले. राहुल द्रविड म्हणाले की, 'केएल राहुल एक चांगला खेळाडू आहे. मला विश्वास आहे की तो जोरदार कमबॅक करेल. ऑस्ट्रेलियात सलामीवीरांसाठी आव्हानात्मक परिस्थिती आहे. केएल राहुल बांगलादेशविरूद्धचा सामना नक्की खेळेल. तो रोहित शर्मासोबत सलामी करताना दिसेल.'

यंदाच्या वर्ल्डकपमध्ये केएल राहुलने पहिल्या तीन सामन्यात अपयशी ठरला आहे. यामुळे नेटकरी आणि क्रिकेट जाणकार देखील बांगलादेशविरूद्धच्या सामन्यात भारताच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवली जात होती. केएल राहुलला संघातून डच्चू मिळेल असेही बोलले जात होते. मात्र या सर्व शक्यतांवर राहुल द्रविड यांनी उत्तर दिले.

राहुल द्रविड स्पष्ट म्हणाले, 'मला आणि रोहितला आमची सलामी जोडी कोण असेल हे स्पष्टपणे माहिती आहे. मला माहिती आहे की केएल राहुलच्या फलंदाजीत काय क्षमता आहे. तो सामन्यावर किती प्रभाव पाडू शकतो हे मला माहिती आहे. तो धडाक्यात पुनरागमन करेल असा मला विश्वास आहे.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Pollution Restrictions : दिल्लीत आजपासून कडक निर्बंध, कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम, PUC शिवाय पेट्रोल मिळणार नाही

जी राम जी! विधेयकामुळे राज्यावर आर्थिक भार, आधीच तिजोरीवर ताण त्यात आणखी खर्च वाढणार

Drugs Seized : साडेतीन कोटींचे अमली पदार्थ जप्त; पुण्यासह पिंपरी, मुंबई, गोव्यात कारवाई; पाच जणांना अटक

शिल्पकलेचे 'भीष्माचार्य' हरपले! पद्मभूषण राम सुतार यांचं निधन

Driving License : वाहन परवान्यासाठी आता ‘जागते रहो’; रात्री एक वाजता स्लॉट खुले, संख्या कमी केल्याने अडचण

SCROLL FOR NEXT