Rahul Dravid Head Coach : बीसीसीआयने नाही होय करत अखेर राहुल द्रविड आणि इतर कोचिंग स्टाफचा वर्ल्डकप 2023 नंतर संपलेला करार अखेर वाढवला आहे. बीसीसीआयने टी 20 वर्ल्डकप डोळ्यासमोर ठेवून आधी आशिष नेहराला गळ घातली होती.
मात्र कर्णधार रोहित शर्मा आणि निवडसमिती अध्यक्ष अजित आगरकर हे राहुल द्रविड यांचा करार वाढवण्याच्या मताचे होते. आशिष नेहराने प्रशिक्षक पदाची ऑफर धुडकावून लावल्यानंतर बीसीसीआयने राहुल द्रविड, पारस म्हाम्ब्रे, राठोड आणि टी दिलीप यांना मुदतवाढ दिली.
मुदतवाढ मिळाल्यानंतर राहुल द्रविड म्हणाला की, 'गेल्या दोन वर्षापासून भारतीय संघासोबतचा प्रवास खूप स्मरणीय राहिला. आम्ही एकत्रितपणे या प्रवासात चढ-उतार पाहिले.खेळाडूंनी माझ्यावर दाखवलेला विश्वास आणि दिलेला पाठिंबा जबरदस्त होता. आम्ही ड्रेसिंग रूममध्ये जे कल्चर निर्माण केलं आहे त्याबद्दल मला खूप अभिमान आहे.'
'हे कल्चर म्हणजे विजय असो वा पराजय भक्कमपणे एकमेकांच्या पाठीशी उभं राहणं! आमच्या संघाकडे जी गुणवत्ता आणि कसब आहे ते वाखाण्याजोगं आहे. आम्ही कायम प्रक्रियेवर लक्ष केंद्रित केलं. त्या प्रमाणे आम्ही तयारी केली. याचा एकूण निकालावर थेट परिणाम होतो.'
राहुल द्रविड (Rahul Dravid) बीसीसीआय अधिकाऱ्यांचे आभार मानता म्हणाला, 'बीसीसीआय आणि त्यांच्या अधिकाऱ्यांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल आणि माझ्या व्हिजनला दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांचे आभार मानतो. भारतीय संघाचे प्रशिक्षक पद सांभाळताना तुम्हाला बराच काळ कुटुंबापासून दूर रहावं लागतं.'
'मी माझ्या कुटुंबाचे केलेला त्याग आणि दिलेल्या पाठिंब्यासाठी आभार मानतो. त्यांनी पडद्यामागून निभावलेली भुमिका अनमोल आहे. वर्ल्डकपनंतर आम्ही नव्या आव्हानांचा आनंदाने सामना करत आहोत. आम्ही सर्वश्रेष्ठ कामगिरी करण्यासाठी प्रतिबद्ध आहोत.'
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.