Rajeev Shukla BCCI
Rajeev Shukla BCCI  esakal
क्रीडा

Rajeev Shukla Betting : 'बेटिंग अ‍ॅप टॅलेंटला प्रोत्साहन देत आहेत पण...' बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला हे काय म्हणाले?

अनिरुद्ध संकपाळ

Rajeev Shukla BCCI Betting : भारतात सध्या क्रिकेट बेटिंग अॅपचा सुळसुळात झाला आहे. भारताचा सामना असेल त्यावेळी क्रिकेट चाहते सामन्याचा आनंद लुटण्याऐवजी बेटिंग अॅपवरील आपला संघ आणि लावलेला पैसा याबाबतच जास्त चिंतेत असतात. मध्यंतरी सरकारने हस्तक्षेप करत या बेटिंग अॅपला लगाम लावण्याचा प्रयत्न केला.

बीसीसीआयने तर एका बेटिंग अॅपला आपला मध्ये प्रायोजकच केलं आहे. एक बेटिंग अॅप बीसीसीआयचे स्पॉन्सर असल्यानंतर त्यांच्यावर टीका होणं सहाजिकच आहे. भारतात बेटिंग कायदेशीर करावं की नको यावरून चर्चा सुरू असते. दरम्यान, बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी या बेटिंग अॅपबाबत एक मोठं वक्तव्य केलं.

यूट्यूबवरील प्रसिद्ध चॅनल अनफिल्टर्ड बाय समधीशने राजीव शुक्ला यांना बेटिंग अॅपबाबत बीसीसीआयचे काय मत आहे असं विचारलं. त्यावेळी राजीव शुक्ला यांनी बेटिंग अॅपबद्दल आपले मत व्यक्त केलं.

राजीव शुक्ला म्हणाले की, 'जोपर्यंत ही बेटिंग अॅप लोकांमधील टॅलेंटला प्रोत्साहन देत आहेत तोपर्यंत ठीक आहे. मात्र काही अॅप हे बेटिंगकडे झुकले आहेत. मग गडबड आहे.'

यानंतर समधीशने राजीव शुक्लांना इंग्लंडमध्ये बेटिंग हे कायदेशील करण्यात आलं आहे भारतात देखील भविष्यात बेटिंगला कायदेशील मान्यता मिळेल का असं विचारलं.

त्यावर शुक्ला म्हणाले की, 'आम्हाला एकाच गोष्टीची चिंता असते की मॅच फिक्सिंग होऊ नये. बेटिंग तर तुम्ही थांबवू शकत नाही. हापूरमध्ये लोकं पाऊस पडणार की नाही याच्यावर बेटिंग करत असतात.'

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबन घेतात, ठाकरे गटाने असं का म्हटलं?

Aditya Dhar & Yami Gautam : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर यामी-आदित्यला पुत्ररत्न; जाणून घ्या बाळाचं नाव आणि त्याचा अर्थ

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप कार्यकर्ते आमने-सामने

Latest Marathi Live News Update: संसदेची सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी आजपासून CISF कडं!

Onion Garlands During Voting: गळ्यात टोमॅटो-कांद्याच्या माळा घालून मतदान; नाशिकमध्ये युवा मतदारांची चर्चा

SCROLL FOR NEXT