Kavya Maran-Rajinikanth 
क्रीडा

Kavya Maran-Rajinikanth : हैदराबादची मालकीण काव्या मारनला उदास नाही पाहू शकत रजनीकांत, SRH ला दिला हा सल्ला

Kiran Mahanavar

Kavya Maran-Rajinikanth : इंडियन प्रीमियर लीगची फ्रँचायझी सनरायझर्स हैदराबाद गेली तीन वर्षे वाईट टप्प्यातून जात आहे. 2021 आणि 2022 मध्ये संघ आठव्या स्थानावर होता. त्याच वेळी गेल्या हंगामात तळाच्या 10 व्या स्थानावर होता. 2016 मध्ये चॅम्पियन बनलेल्या संघाची कामगिरी पाहून त्याची मालकीण काव्या मारन स्टेडियममध्ये चांगलीच निराश झाली होती. काव्याचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्याला निराश झाल्याचे पाहून चाहत्यांनाही वाईट वाटले. या यादीत ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांचाही समावेश आहे.

सनरायझर्स संघाने गेल्या हंगामात आपला कर्णधार केन विल्यमसनला काढून टाकले आणि दक्षिण आफ्रिकेच्या एडन मार्करामकडे ही जबाबदारी सोपवली. त्याचवेळी वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन लारा याला कोच बनवण्यात आले. संघाच्या कोचिंग स्टाफमध्ये श्रीलंकेचा अनुभवी फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज डेल स्टेन यांचाही समावेश आहे. हे दिग्गज असूनही संघाच्या कामगिरीत सुधारणा झाली नाही आणि त्याने जवळपास प्रत्येक सामन्यात काव्या मारन आणि संघाच्या चाहत्यांची निराशा केली.

काय म्हणाले रजनीकांत?

सुपर स्टार रजनीकांतने सनरायझर्स हैदराबादबद्दलच्या आपल्या भावना उघडपणे शेअर केल्या. त्याने कबूल केले की, काव्या मारनला टीव्हीवर नाराज पाहून आपल्याला त्रास होतो. सनरायझर्स हैदराबादने भविष्यात चांगले खेळाडू निवडावेत, अशी त्याची इच्छा आहे.

जेलर ऑडिओ लॉन्चमध्ये बोलताना रजनीकांत म्हणाले की, काव्या मारनचे वडील यांनी सनरायझर्स हैदराबाद संघात चांगले खेळाडू ठेवले पाहिजेत. आयपीएलदरम्यान काव्याला टीव्हीवर असे पाहून मला वाईट वाटते. एसआरएचच्या मालकाची 'थलैवा'ची ही विनंती आता इंटरनेटवर व्हायरल झाली आहे.

अलीकडेच असे वृत्त आहे की फ्रँचायझीने खराब कामगिरीच्या मालिकेनंतर प्रशिक्षक ब्रायन लारा यांना काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या जागी लखनऊ सुपर जायंट्सचे माजी प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांना प्रशिक्षक बनवले जाऊ शकते. लखनऊने फ्लॉवरच्या जागी ऑस्ट्रेलियाला टी-20 विश्वचषकात विजय मिळवून देणाऱ्या जस्टिन लँगरची नियुक्ती केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-Russia Relations: ''भारत-रशिया मिळून दहशतवादाला चोख उत्तर देणार'', परराष्ट्र मंत्र्यांचा रशियातून इशारा

Farmer ID : फार्मर आयडी नोंदणीत गोंधळ; सातबारा एकाचा, आधार लिंकिंग दुसऱ्याचे!

MP Nilesh Lanke : पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी; खासदार नीलेश लंके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

Maharashtra Latest News Update: विधीमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीची खोपोली ते कुसगाव या मिसिंगलिंक प्रकल्पास भेट

Mokhada News : जगण्यासाठी छळ, मरणानंतर यातना; मोखाड्यातील आदिवासींच्या नशिबाचे दुष्टचक्र

SCROLL FOR NEXT