ranji trophy 2022 23 kedar jadhav maharashtra vs assam live score cricket news kgm00 
क्रीडा

Ranji Trophy: तब्बल तीन वर्षांनंतर पुनरागमन करत केदार जाधवचा तांडव

केदार जाधव ३ वर्षानंतर मैदानावर उतरला, २० चेंडूंत चोपल्या ९२ धावा

सकाळ ऑनलाईन टीम

Ranji Trophy : केदार जाधव याने तब्बल तीन वर्षांनंतर झळकावलेल्या रणजी करंडकातील शतकाच्या जोरावर महाराष्ट्राने येथे सुरू असलेल्या ब गटातील आसामविरुद्धच्या लढतीत दुसऱ्या दिवसअखेरीस ३३ धावांची आघाडी घेतली आहे.

केदारने नाबाद १४२ धावांची खेळी साकारताना झोकात पुनरागमन केले. त्याला सिद्धेश वीर याने ९४ धावा फटकावत मोलाची साथ दिली. आसामच्या २७४ धावांना प्रत्युत्तर देताना महाराष्ट्राने २ बाद ३०७ धावा फटकावल्या आहेत.

ऋतुराज गायकवाड व राहुल त्रिपाठी या खेळाडूंविना महाराष्ट्राचा संघ या लढतीसाठी मैदानात उतरला. दोघांचीही श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० लढतींसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. आसामचा पहिला डाव २७४ धावांवरच आटोपला.

महाराष्ट्राच्या पहिल्या डावाची सुरुवात निराशाजनक झाली. रंजीत माली याने पवन शाह याला १८ धावांवर पायचीत बाद केले, पण त्यानंतर सिद्धेश वीर व नौशाद शेख या जोडीने ७३ धावांची भागीदारी केली.

संक्षिप्त धावफलक ः आसाम- पहिला डाव सर्व बाद २७४ धावा वि. महाराष्ट्र- पहिला डाव २ बाद ३०७ धावा (पवन शाह १८, सिद्धेश वीर नाबाद ९४, नौशाद शेख ४७, केदार जाधव नाबाद १४२- १४६ चेंडू, १४ चौकार, ६ चौकार, मुख्तार हुसैन १/४०, रंजीत माली १/७२).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT