Ranji Trophy 2022 World Record Sakibul Gani Sakal
क्रीडा

कोण आहे Sakibul Gani? ज्यानं Ranji Trophy मध्ये रचला इतिहास

सुशांत जाधव

Ranji Trophy 2022, World Record : बिहारचा 22 वर्षीय फलंदाज साकिबुल गनी याने रणजी ट्रॉफी स्पर्धेत धमाकेदार पदार्पण केलं. दमदार त्रिशतकी खेळीसह त्याने वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. मिझोराम विरुद्धच्या सामन्यात साकिबुल गनी याने 405 चेंडूत 341 धावा केल्या. पदार्पणाच्या सामन्यात त्रिशतक झळकवणारा तो क्रिकेट जगतातील पहिला फलंदाज ठरलाय. आपल्या विश्व विक्रमी त्रिशतकी खेळीत त्याने 56 चौकार आणि 2 गगनचुंबी षटकारही खेचले.

बिहारच्या डावात पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या साकिबुल गनीने आणि बाबुल कुमार या जोडीनं पाचव्या विकेटसाठी 538 धावांची भागीदारी रचली. बाबुल कुमार दुसऱ्या दिवसाअखेर 229 धावांवर नाबाद होता. यापूर्वी मध्‍य प्रदेशच्या अजय रोहेरा याने 2019-20 च्या हंगामात हैदराबाद विरुद्ध फर्स्‍ट क्‍लास डेब्‍यू सामन्यात नाबाद 267 धावांची खेळी केली होती. साकिबुल गनीने 387 चेंडूत त्रिशतक साजरे केले. बिहार आणि मिझोराम यांच्यातील सामना जाधवपुर यूनिवर्सिटी कँम्पस मध्ये खेळवला जात आहे. दुसऱ्या दिवशी बिहारी बाबूनं विक्रमाला गवसणी घातली.

भागीदारीचा विक्रम

साकिबुल गनी आणि बाबुल कुमार जोडीनं चौथ्या विकेटसाठी 538 धावांची भागीदारी केली. फर्स्ट क्लास क्रिकेटमधील ही सर्वोच्च भागीदारीपैकी एक आहे. फर्स्‍ट क्‍लास क्रिकेटमध्ये सर्वोच्च भागीदारीचा विक्रम हा श्रीलंकेच्या कुमार संगकारा आणि महिला जयवर्धने यांच्या नावे आहे. या दोघांनी 2006 मध्ये आफ्रिका विरुद्धच्या सामन्यात 624 धावांची भागीदारी केली होती.

रणजी ट्रॉफीतील सर्वोच भागीदारीचा विक्रम हा महाराष्‍ट्राच्या स्‍वप्निल गुगले आणि अंकित बावने या जोडीच्या नावे आहे. या दोघांनी 594 धावांची भागीदारी रचली होती. 1946/47 च्या हंगामात विजय हजारे आणि गुल मोहम्‍मद या जोडीनं बडोदासाठी 577 धावांची भागीदारी केली होती.

कोण आहे साकिबुल गनी

साकिबुल गनी याचा जन्म बिहारमधील मोतीहरी येथे झाला. त्याने ए लिस्ट क्रिकेटमध्ये 14 सामन्यात 377 धावा केल्या आहेत. 11 टी-20 सामन्यात त्याच्या खात्यात 192 धावांची नोंद आहे. 7 आक्टोबर 2019 मध्ये त्याने विजय हजारे ट्रॉफीतून ए लिस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केले. 11 जानेवारीमध्ये तो सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत खेळला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT