Ranji Trophy 2022 Delhi vs Tamil Nadu Lalit Yadav  Sakal
क्रीडा

VIDEO : ये तो पंत का स्टाईल है; ललित फटका मारायला गेला अन्..

सुशांत जाधव

Ranji Trophy 2022 Delhi vs Tamil Nadu : रणजी स्पर्धेतील दिल्ली आणि तामिळनाडू यांच्यातील सामना गुवाहटीच्या मैदानात रंगला आहे. दिल्लीनं पहिल्यांदा बॅटिंग करताना तामिळनाडूसमोर 452 धावा केल्या. . दुसऱ्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा तामिळनाडूनं 2 विकेट गमावून 75 धावा केल्या होत्या. दिल्लीकडून अंडर 19 संघाचा कर्णधार आणि सलामीवीर यश धूरनं 113 धावांची खेळी केली. पदार्पणाच्या सामन्यात त्याने दिमाखदार छाप सोडली. त्याच्याशिवाय जॉन्टी सिंधून 71 तर ललित यादवनं सर्वाधिक 177 धावांची खेळी केली.

दिल्लीच्या डावातील 131 व्या षटकात ललित यादव (Lalit Yadav) आणि कुलदीप यादव (Kuldip Yadav) ही जोडी मैदानात होती. एम मोहम्मदच्या गोलंदाजीवर ललित यादवनं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. बॉल आणि बटचा संपर्क झाला. पण ललितच्या हातून बॅट सुटली. रिषभ पंतच्या बाबतीत जो सीन दोन तीन वेळा पाहायला मिळाला. अगदी तोच क्षण नव्याने अनुभवायला मिळाला. ललित यादवनं हातून बॅट सुटल्यानंतर सेफ क्रीजमध्ये येण्याला प्राधान्य दिले. सुदैवाने ज्या दिशेला बॅट पडली त्याठिकाणी कोणीच फिल्डर नव्हता. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

आयपीएलमध्ये पंतच्या नेतृत्वाखालीच खेळणार आहे ललित यादव

आयपीएलच्या मेगा लिलावात दिल्ली कॅपिटल्सने ललित यादवला आपल्या ताफ्यात सामील करुन घेतलं. आगामी आयपीएलमध्ये तो पंतच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसेल. आपल्या कर्णधाराकडून जी गोष्ट घडली आहे अगदी तिच गोष्ट त्याच्याकडून घडल्याचा कमालीचा योगायोग क्रिकेटच्या मैदानात दिसून आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT