s sreesanth hospitalized serious injury Sakal
क्रीडा

Ranji Trophy : श्रीसंतला दुखापत; हॉस्पिटमधील फोटो व्हायरल

सकाळ डिजिटल टीम

भारतीय संघाच्या टी-20 आणि वनडे वर्ल्ड कप विजेत्या संघाचा सदस्य राहिलेला श्रीसंत दुखापतग्रस्त झालाय. आयपीएलच्या मेगा लिलावात भाव न मिळालेला श्रीसंत (cricketer S. Sreesanth) रणजी ट्रॉफी स्पर्धेत केरळ संघाकडून मैदानात उतरला आहे. 39 वर्षीय जलदगती गोलंदाजावर दुखापतीमुळे रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आलीये. श्रीसंतने सोशल मीडियाच्या माध्यमातून हॉस्पिटलमधील एक फोटो शेअर केलाय. लवकरात बरा हो, असा संदेश त्याला मित्रांकडून येत आहेत. श्रीसंतचा हॉस्पिटलमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. (Ranji Trophy 2022 s sreesanth hospitalized serious injury sbj86)

रणजी स्पर्धेतील (Ranji Trophy) सामन्यापूर्वी सराव करत असताना त्याला दुखापत झालीये. दुखापतीनंतर त्याला चालणेही शक्य नव्हते. दुखापतीमुळे त्याला आता काही सामन्याला मुकावे लागणार आहे. केरळ संघाची रणजी ट्रॉफीतील पुढची लढत सौराष्ट विरुद्ध रंगली आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून श्रीसंतने मेघालय विरुद्धच्या सामन्यातून कमबॅक केले होते. केरळकडून त्याने 2 विकेटसह 19 धावांचे योगदानही दिले होते.

उजव्या हाताने जलदगती गोलंदाजी करणारा श्रीसंत 2013 मध्ये स्पॉट फिक्सिंग प्रकरणाच्या आरोपात अडकला होता. तेव्हापासून त्याच्यासाठी आयपीएलचे दरवाजेही बंद झालेत. मिनी आयपीएलसह मेगा आयपीएलमध्ये त्याने नाव नोंदणी केली होती. पण त्याला किंमत देऊन संघात घ्यायची हिम्मत कुणीही दाखवली नाही. आयपीएलच्या मेगा लिलावात त्याने 50 लाख या मूळ किंमतीसह नाव नोंदणी केली होती. आयपीएलमध्ये ठेंगा मिळाल्यानंतरही त्याने आपल्या भावना एका गाण्याच्या माध्यमातून व्यक्त केल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India CPI Inflation: देशात पुन्हा महागाईचा भडका! दुष्काळ अन् वाढत्या महागाईत ग्रामीण भागाची दुहेरी होरपळ

IND vs WI: विंडिजच्या दोन खेळाडूंवर ICC ची कारवाई; भारताविरुद्ध T20I मालिका सुरू असतानाच नेमकं काय घडलं?

Rahul Gandhi: राहुल गांधींचा मोठा दावा! म्हणाले, ''मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचे मला मेसेज येतात..''

Someshwar Sugar Factory Election Result : सोमेश्वर कारखान्याच्या निवडणूकीत सुनेत्रा पवार यांच्या पॅनेलची मुसंडी.... विजयाच्या दिशेने घौडदौड.....; पुरुषोत्तम जगताप यांना दारुण पराभव

Sri Lanka Politics: आधी मुलगा, आता पत्नी अडचणीत; महिंदा राजपक्षे ICU मध्ये, श्रीलंकेत सध्या काय घडतंय?

SCROLL FOR NEXT