Ranji Trophy 2023 final  ESAKAL
क्रीडा

Ranji Trophy 2023 Final : पहिल्याच दिवशी सौराष्ट्रने बंगालला त्याच्याच घरात घुसून लोळवले

रणजी ट्रॉफी 2023 ची फायनल बंगाल आणि सौराष्ट्र यांच्यात इडन गार्डवर होत आहे.

अनिरुद्ध संकपाळ

Ranji Trophy 2023 final : रणजी ट्रॉफी 2023 ची फायनल बंगाल आणि सौराष्ट्र यांच्यात इडन गार्डवर होत आहे. बंगालने 33 वर्षापूर्वी इडन गार्डवरच रणजी ट्रॉफी जिंकली होती. त्यानंतर त्यांना ही ट्रॉफी हातात घेण्याची संधी मिळालेली नाही. यंदाची फायनल देखील इडन गार्डवर होत असल्याने बंगालच्या आशा वाढल्या आहेत.

मात्र या आशेवर सौराष्ट्रने पहिल्याच दिवशी पाणी फेरले. त्यांनी नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

चेतन साकरिया आणि जयदेव उनाडकट या स्टार गोलंदांनी बंगालला सुरूवातीपासूनच धक्के देण्यास सुरूवात केली. या दोघांनी बंगालची त्यांच्याच घरच्या मैदानावर 6 बाद 65 धावा अशी अवघड अवस्था करून ठेवली.

या पडझडीनंतर बंगालचा अष्टपैलू खेळाडू शाहबाज अहमद अभिषेक पोरेल यांनी बंगालची लाज वाचवली. या दोघांनी सातव्या विकेटसाठी 101 धावांची झुंजार भागीदारी रचली.

शाहबाज अहमदने 112 चेंडूत 69 धावांची खेळी केली. त्याला पोरेलने 50 धावांची खेळी करत चांगली साथ दिली. मात्र अखेर जडेजाने ही जोडी फोडली.

त्यानंतर चिराग जानी, जयदेव उनाडकटने बंगालचा पहिला डाव 174 धावात गुंडाळला. सौराष्ट्रकडून चेतन साकरिया आणि जयदेव उनाडकट या दोन डावखुऱ्या वेगवान गोलंदाजांनी प्रत्येकी 3 तर जडेजा आणि चिराग जानी यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले.

बंगालच्या 174 धावांच्या प्रत्युत्तरात सौराष्ट्रने आपल्या पहिल्या डावाची दमदार सुरूवात केली. आकाश दीपने सलामीवीर जय गोहिलला 6 धावांवर बाद केले. मात्र दुसरा सलामीवीर हार्विक देसाई आणि विश्वराज जडेजाने भागीदारी रचत संघाला सत्तरी पार करून दिली.

अखेर ही जोडी मुकेश कुमारने फोडली. त्याने विश्वराज जडेजाला 25 धावांवर बाद केले. सौराष्ट्रने पहिल्या दिवशीचा खेळ संपला त्यावेळी 2 बाद 81 धावा केल्या होत्या. सलामीवीर हार्विक देसाई 38 तर चेतन साकरिया 2 धावांवर नाबाद होता.

(Sports Latest News)

हेही वाचा : वर्क फ्राॅम होम ते 'कायमचे घरी बसा?' हा प्रवास नक्की काय सांगतोय...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Beach Closed : गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांना बंदी! उदय सामंतांच्या सूचनेनंतर प्रशासनाकडून कडक पाऊल, अरबी समुद्रानं धारण केलंय रौद्ररूप

India IT Sector: टेक विश्वात ‘ले-ऑफ’चा भूकंप, भारताला फटका; मागील सहा महिन्यांतच १.१९ लाख जणांचा रोजगार गेला

Bhandara Accident: भंडाऱ्यात भीषण अपघात! भरधाव ट्रेलरची एसटी बसला जोरदार धडक; चालक-वाहकासह सात जण जखमी

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात आंदोलन तीव्र; १८ जुलैला पंढरपुरात शेतकऱ्यांची 'सद्बुद्धी यात्रा'

Kolhapur Accident: हृदयद्रावक! कागलमध्ये जुने घर कोसळले; आईचा मृत्यू, शेजारी बसलेला १४ वर्षीय मुलगा बचावला

SCROLL FOR NEXT