Ranji Trophy 2024 Maharastra Squad announced Kedar Jadhav captain cricket news in marathi 
क्रीडा

Ranji Trophy 2024 : महाराष्ट्र संघाच्या कर्णधारपदी केदार जाधव! 'या' खेळाडूंना दिली संधी

Kiran Mahanavar

Ranji Trophy 2024 Maharashtra Squad Announced : यंदाच्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाचे नेतृत्व केदार जाधवकडे सोपविण्यात आले आहे.

यंदाच्या रणजी हंगामास पाच जानेवारीपासून प्रारंभ होत आहे. महाराष्ट्राचा एलिट ‘अ’ गटात समावेश असून मणिपूर, झारखंड, राजस्थान, हरियाना, सौराष्ट्र, विदर्भ, सेनादल हे गटातील अन्य संघ आहेत. या संघात प्रशांत सोळंकी या मुंबईच्या लेगस्पिन गोलंदाजाचा व्यावसायिक खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला आहे.

याआधी विजय हजारे करंडक एकदिवसीय स्पर्धेत मुंबईकडून खेळणारा प्रशांत सोळंकी चार दिवसांच्या रणजी स्पर्धेत महाराष्ट्राकडून पदार्पण करेल. प्रशांत सोळंकीच्या बरोबरीने ओंकार खाटपे, रामकृष्ण घोष, हितेश वाळुंज, ओम भोसले आणि धनराज शिंदे हे खेळाडू रणजित पदार्पण करणार आहेत.

महाराष्ट्राचा पहिला सामना सोलापुरात इंदिरा गांधी मैदानावर मणिपूर संघाविरुद्ध पाच ते ८ जानेवारी दरम्यान होत आहे. दुसरा सामना झारखंड संघाबरोबर १२ ते १५ जानेवारी दरम्यान एमसीए मैदान गंहुजे, तिसरा सामना राजस्थान बरोबर १९ ते २२ दरम्यान जोधपूर, चौथा सामना हरियाना संघाबरोबर २६ ते २९ दरम्यान चौधरी बन्सीलाल मैदान, लाही येथे सौराष्ट्र विरुद्ध पाचवा सामना एमसीए मैदान गंहुजे, विदर्भ संघाबरोबर २ ते ५ फ्रेबुवारी दरम्यान सहावा सामना एमसीए मैदान गंहुजे तर सातवा सामना सेनादल संघाबरोबर १६ ते १९ फेब्रुवारी दरम्यान दिल्ली येथे होणार आहे.

संघ : केदार जाधव (कर्णधार), नौशाद शेख, सिद्धेश वीर, अंकित बावणे, निखिल नाईक, अझिम काझी, अक्षय पालकर, ओंकार खाटपे, रामकृष्ण घोष, प्रशांत सोळंकी, हितेश वाळुंज, प्रदिप दाढे, ओम भोसले, विकी ओस्तवाल, धनराज शिंदे, विशांत मोरे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : मराठी विजय मेळाव्यासाठी नवी मुंबईतून शेकडो कार्यकर्ते मुंबईकडे रवाना

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींनो बँक बॅलेन्स चेक करा... किती येणार 1500 की 3000? जून महिन्याच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट

मुंबईत हिंदीत बोलणार, औकात असेल तर हात लावून दाखवा; स्वामी आनंद स्वरुप यांचं ठाकरे बंधूंना आव्हान

"अरे एडिटिंग तरी धड करा" सारंगच्या कावड वारीचा प्रोमो बघून प्रेक्षकांनी दाखवली चूक ; म्हणाले..

PM Modi Leaf Plate: मोदींनी परदेश दौऱ्यात 'या' खास पानावर केले जेवण, जाणून घ्या 'या' पानावर जेवणाचे काय आहेत फायदे

SCROLL FOR NEXT