Ranji Trophy 2024 Vidarbha vs Maharashtra Marathi News sakal
क्रीडा

Ranji Trophy : महाराष्ट्र संघाचा पाय खोलात! विदर्भच्या संघाचे वर्चस्व

Kiran Mahanavar

Ranji Trophy 2024 Vidarbha vs Maharashtra : रणजी क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र संघाचा पाय अधिक खोलात गेला तर दुसऱ्या बाजूला विदर्भ संघाने आपली स्थिती अधिक बळकट करुन २३१ धावांची आघाडी घेतली.

गहुंजे येथील स्टेडियमवर सुरु असलेल्या या सामन्यात पहिल्या दोन्ही दिवसांवर विदर्भने वर्चस्व राखले आहे. महाराष्ट्राला कालच्या पहिल्या दिवश २०८ धावांवर गुंडाळल्यावर आज दिवस अखेर ६ बाद ४३९ धावांपर्यंत मजल मारली.

मुळचा कर्नाटकचा असलेला माजी कसोटीवीर करुण नायरने नाबाद १२८ धावांची खेळी केली. त्याचप्रमाणे मुळचा दिल्लीचा असलेल्या ध्रुव शौरे याचे ९१ तर अक्षय वाडकरने ९० धावांची खेळी केली.

कालच्या १ बाद १११ धावांवरुन आज खेळ पुढे झाल्यावर महाराष्ट्राच्या गोलंदाजांना दिवसभरात केवळ पाचच फलंदाज बाद करता आले तर विदर्भाच्या फलंदाजांनी ३२८ धावां फटकावल्या. काल ५५ धावांवर नाबाद असलेल्या शौरेचे शतक आठ धावांनी हुकले मात्र त्यानंतर फलंदाजीस आलेल्या करुण नायरने नाबाद १२८ धावांची खेळी केली.

सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या यष्टीरक्षक फलंदाज अक्षय वाडकरचेही शतक दहा धावांनी हुकले, परंतु त्याने ९० धावांसाठी १०१ चेंडू घतले आणि १२ चौकार मारले.

महाराष्ट्राला बाद फेरीच्या आशा जिवंत ठेवायच्या असतील तर या सामन्यासह पुढच्या लढतींतही बोनस गुणांसह निर्णायक विजयाची आवश्यकता आहे.

संक्षिप्त धावफलक ः महाराष्ट्र, पहिला डाव ः २०८. विदर्भ, पहिला डाव ः ६ बाद ४३९ (ध्रुव शौरे ९२, करुण नायर खेळत आहे १२८, यश राठोड ४२, अक्षय वाडकर ९०, प्रदीप दाधे ९७-२, अक्षय पालकर १००-२)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SLC XI Warm up: टीम इंडियाने सहज जिंकला सराव सामना! आता सुरू होणार खरी परीक्षा, पाहा कसोटी मालिकेचे वेळापत्रक

Buldhana Accident: खदाणीच्या पाण्यात बुडून दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू; मेहकर तालुक्यातील कोराडी प्रकल्पाजवळील घटना

फोटो काढायला आली अन् Kiss करून गेली! चाहतीचं भयंकर कृत्य पाहून घाबरली अभिनेत्री, Viral Video

Bhokardan Accident: भोकरदन-वालसावंगी मार्गावरील धोकादायक विहिरी ठरताहेत मृत्यूचा सापळा; कार विहिरीत कोसळून दोन महिलांचा मृत्यू

Ambad Accident: खंडोबाची वारी मागण्यासाठी आले अन् काळाचा घाला; अंबडमध्ये टेम्पोच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT