ranji trophy elite group a maharashtra fight to avoid defeat vidarbha hopes to win  Sakal
क्रीडा

Ranji Trophy : पराभव टाळण्यासाठी महाराष्ट्राची झुंज; विदर्भाला डावाने विजयाची आशा

महाराष्ट्राचा संघ रणजी क्रिकेट करंडकातील एलिट ‘अ’ गटातील लढतीत पराभव टाळण्यासाठी झुंज देत आहे. महाराष्ट्राला पहिल्या डावात २०८ धावांमध्ये गुंडाळल्यानंतर विदर्भाच्या संघाने पहिल्या डावात ५५२ धावांचा डोंगर उभारला.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : महाराष्ट्राचा संघ रणजी क्रिकेट करंडकातील एलिट ‘अ’ गटातील लढतीत पराभव टाळण्यासाठी झुंज देत आहे. महाराष्ट्राला पहिल्या डावात २०८ धावांमध्ये गुंडाळल्यानंतर विदर्भाच्या संघाने पहिल्या डावात ५५२ धावांचा डोंगर उभारला. महाराष्ट्राच्या संघाने दुसऱ्या डावात ३ बाद १८७ धावा केल्या असून अजूनही त्यांचा संघ १५७ धावांनी पिछाडीवर आहे.

विदर्भाचा संघ या लढतीत डावाने विजय मिळवण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करील. विदर्भाच्या संघाने रविवारी ६ बाद ४३९ या धावसंख्येवरून पुढे खेळायला सुरुवात केली. प्रदीप दाढे याने करूण नायर याला मोठी खेळी उभारू दिली नाही. त्याने कालच्या (१२८ धावा) धावसंख्येत आणखी एक धावेची भर घातली.

१२९ धावांच्या खेळीत त्याने १८ चौकार मारले. हर्ष दुबे याने ५७ चेंडूंमध्ये ४६ धावांची खेळी केली. विदर्भाने पहिल्या डावात ५५२ धावा फटकावल्या. हितेश वाळुंज याने १२७ धावा देत चार फलंदाज बाद केले. विदर्भाने पहिल्या डावात ३४४ धावांची आघाडी मिळवली.

महाराष्ट्राने दुसऱ्या डावात ३ बाद १८७ धावा केल्या आहेत. मुर्तझा ट्रंकवाला व दिग्विजय पाटील यांनी दमदार अर्धशतके झळकावली. मुर्तझा याने १५ चौकारांचा पाऊस पाडत ८६ धावांची खेळी साकारली. आता दिग्विजय पाटील याने सात चौकारांसह ६१ धावांची खेळी केली आहे. त्याच्यासोबत आशय पालकर १७ धावांवर खेळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Silver Price Today: दिवाळीपूर्वी चांदीने 2 लाखांचा टप्पा ओलांडला; एकाच दिवसात 10,000 रुपयांची वाढ

Maratha Reservation : 'कुणबी प्रमाणपत्र दिल्याशिवाय कोणतीही सरकारी नोकरभरती करू नका'; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

Mumbai : ठाकरे बंधूंसह मविआचे नेते पुन्हा निवडणूक आयोगाची भेट घेणार, पण शरद पवार अनुपस्थित

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! PM किसान योजनेचा 21वा हप्ता 'या' दिवशी येऊ शकतो

High Court: राज्य सरकारला दणका, 'तो' निर्णय हायकोर्टानं केला रद्द

SCROLL FOR NEXT