Ranji Trophy Himmat Singh Replaces Yash Dhull As Delhi Captain sakal
क्रीडा

Ranji Trophy : लाजिरवाण्या पराभवानंतर यश धुलची कर्णधारपदावरून हकालपट्टी! 'या' खेळाडूच्या हाती संघाची धुरा

Ranji Trophy News |

Kiran Mahanavar

Ranji Trophy Himmat Singh Replaces Yash Dhull As Delhi Captain : रणजी ट्रॉफीच्या एलिट ग्रुप डी सामन्यात दिल्ली संघाला पुद्दुचेरीविरुद्ध लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यात पुद्दुचेरीच्या गोलंदाजांचा दबदबा पाहायला मिळाला, त्यामुळे दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर यजमान संघाला पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर दिल्ली संघाने मोठी अॅक्शन घेत कर्णधार बदलला.

रणजी ट्रॉफीच्या सुरुवातीच्या सामन्यात पुद्दुचेरीकडून झालेल्या पराभवानंतर काही तासांतच यश धुलची दिल्लीच्या कर्णधारपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. 12 जानेवारीपासून होणाऱ्या जम्मू-काश्मीरविरुद्धच्या सामन्यात सीनियर फलंदाज हिम्मत सिंग आता दिल्लीचे नेतृत्व करणार आहे.

अंडर-19 वर्ल्ड कप विजेत्या संघाचा कर्णधार असलेल्या धुलकडे डिसेंबर 2022 मध्ये दिल्लीची कमान सोपवण्यात आली होती. त्याने फेब्रुवारी 2022 मध्ये पदार्पण केले. आतापर्यंत त्याने 43.88 च्या सरासरीने 1185 धावा केल्या आहेत. पुद्दुचेरीविरुद्ध नऊ गडी राखून झालेल्या पराभवादरम्यान यश धुल केवळ 2 आणि 23 धावा करू शकला. या 21 वर्षीय फलंदाजाने या हंगामाच्या सुरुवातीला मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये दिल्लीचे नेतृत्वही केले होते.

गतवर्षी यश धुलच्या अनुपस्थितीत हिम्मतच्या नेतृत्वाखाली दिल्लीने मुंबईवर मोठा विजय नोंदवला होता. हिम्मतने 2017 मध्ये पदार्पण केले आणि त्याने आतापर्यंत 22 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. वेगवान गोलंदाज नवदीप सैनी आणि इशांत शर्मा जम्मू-काश्मीरविरुद्धच्या पुढील सामन्यात खेळणार नाहीत. सैनीची भारत अ संघात निवड करण्यात आली आहे, तर इशांत दिल्लीत होणाऱ्या सामन्यांसाठीच उपलब्ध होणार असल्याचे कळते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT