Prithvi Shaw Ranji Trophy :  sakal
क्रीडा

Prithvi Shaw: 49 चौकार अन् 6 षटकार! पृथ्वी शॉने जागेवरूनच ठोकल्या 232 धावा

पृथ्वीचे हे त्रिशतक पुन्हा एकदा टीम इंडियाचे दरवाजे उघडणार ?

Kiran Mahanavar

Prithvi Shaw Ranji Trophy : मुंबईचा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉने रणजी ट्रॉफी सामन्यात त्रिशतक झळकावून नवीन वर्षाची धमाकेदार सुरुवात केली आहे. ९ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिकेपूर्वी पृथ्वीचे हे त्रिशतक त्याच्यासाठी पुन्हा एकदा टीम इंडियाचे दरवाजे उघडू शकते.

मुंबईच्या या धडाकेबाज सलामीवीराने आसामविरुद्ध 383 चेंडूत 379 धावांची खेळी केली. पृथ्वीने 49 चौकार आणि 6 षटकारांच्या मॅरेथॉन खेळीत अनेक विक्रम केले. प्रथम श्रेणी क्रिकेटमधील पृथ्वीची ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. याआधी पृथ्वीची प्रथम श्रेणीतील सर्वोच्च धावसंख्या 202 धावा होती.

पृथ्वी शॉ ज्या पद्धतीने फलंदाजी करत होता, त्यावरून असे वाटत होते की 400 धावा सहज पार करल, पण फिरकीपटू रियान परागने त्याला एलबीडब्ल्यू आऊट केले. आता पृथ्वी मुंबईच्या रणजी संघाच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला आहे.

आज सामन्याच्या दुसऱ्या दिवशी त्याने कालच्या 240 धावांच्या स्कोअरसह आपला डाव पुढे नेला आणि दृष्टीक्षेपात त्रिशतक ठोकले. गुवाहाटी येथे सुरू असलेल्या ग्रुप-बी सामन्यात त्याच्यासोबत 73 धावा करणारा कर्णधार अजिंक्य रहाणेने शतक झळकावले आहे. दोघांमध्ये तिसऱ्या विकेटसाठी 401 धावांची ऐतिहासिक भागीदारी झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT