Ranji Trophy sakal
क्रीडा

Ranji Trophy: मुंबईने 93 वर्ष जुना विक्रम मोडून रचला इतिहास

पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखालील मुंबई संघाने उत्तराखंडचा 725 धावांच्या मोठ्या फरकाने केला पराभव

Kiran Mahanavar

Ranji Trophy: रणजी ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व सामन्यात पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखालील मुंबई संघाने उत्तराखंडचा 725 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. या विजयासह मुंबईने रणजी करंडक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. मुंबईचा हा विजय प्रथम श्रेणी क्रिकेटमधील सर्वात मोठा विजय आहे. मुंबईने या सामन्यात उत्तराखंडला 795 धावांचे लक्ष्य दिले. प्रत्युत्तरात उत्तराखंडचा संघ दुसऱ्या डावात केवळ 69 धावा करू शकला.

न्यू साउथ वेल्सने यापूर्वी 1929-30 मध्ये क्वीन्सलँडवर 685 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला होता. मुंबईने तब्बल 93 वर्षांनंतर हा विक्रम आपल्या नावावर केला आहे. रणजी ट्रॉफीमध्ये धावांच्या फरकाने सर्वात मोठा विजय बंगालच्या नावावर होता. 1953-54 मध्ये ओडिशाचा 540 धावांनी पराभव केला होता.

सुवेद पारकरने पदार्पणाच्या सामन्यातच द्विशतक (252) आणि सर्फराज खानच्या 153 धावांच्या शतकाच्या जोरावर मुंबईने पहिला डाव 647/8 धावांवर घोषित केला. उत्तराखंडचा संघ पहिल्या डावात केवळ 114 धावांत आटोपला. मुंबईकडून शम्स मुलानीने सर्वाधिक 5 विकेट घेतले. मुंबईने 533 धावांच्या आघाडीसह दुसरा डाव 261/3 वर घोषित केला आणि उत्तराखंडसमोर 794 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले. उत्तराखंडच्या फलंदाजांनी पुन्हा एकदा निराशा केली आणि संघाला केवळ 69 धावा करता आल्या.

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वात मोठ्या विजयाचा विक्रम -

  • मुंबई (उत्तराखंड विरुद्ध 2022) - 725 धावा

  • न्यू साउथ वेल्स (क्वीन्सलँड विरुद्ध, 1929/30 मध्ये) - 685 धावा

  • इंग्लंड (ऑस्ट्रेलिया विरुद्ध, 1928/29 मध्ये) - 675 धावा

  • न्यू साउथ वेल्स (दक्षिण ऑस्ट्रेलिया विरुद्ध, 1920/21 मध्ये) - 638 धावा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऑनलाइन ग्रोसरी ऑर्डर करण्याआधी सावधान! Blinkit च्या फ्रीजरमध्ये जिवंत उंदीर आढळला; स्टोअरचा व्हिडिओ व्हायरल

पेपरमध्ये ढीगभर चुका, UGC-NET परीक्षेचे तीन पेपर पुन्हा होणार, तारीखही जाहीर...

Rohit Sharma: बाप रे बाप...! सायकलवरून हजारो किमीचा प्रवास करून आलेल्या फॅनला भेटल्यावर कशी होती रोहितची रिअ‍ॅक्शन, Viral Video

Phone Charging Tips: Airplane Mode ON करून फोन चार्ज केला तर काय होतं? जाणून घ्या

Shirur Bypass Crash: शिरूर बायपासवर पुन्हा बळी; तुटलेल्या दुभाजकातून दुचाकी नेणे जीवावर बेतले

SCROLL FOR NEXT