ranji trophy prithvi shaw marathi news sakal
क्रीडा

Ranji Trophy : पृथ्वी शॉचा हल्लाबोल...! गुडघ्याच्या दुखापतीनंतर जोरदार पुनरागमन; कर्णधार रहाणे पुन्हा फेल

गुडघा दुखापतीमुळे प्रदीर्घ कालावधीनंतर पुनरागमन करणाऱ्या पृथ्वी शॉने आपल्या दुसऱ्याच सामन्यात आपल्या बॅटमधील चमक तशीच कायम असल्याचे दाखवून दिले....

Kiran Mahanavar

Ranji Trophy : गुडघा दुखापतीमुळे प्रदीर्घ कालावधीनंतर पुनरागमन करणाऱ्या पृथ्वी शॉने आपल्या दुसऱ्याच सामन्यात आपल्या बॅटमधील चमक तशीच कायम असल्याचे दाखवून दिले. छत्तीसगडविरुद्धच्या रणजी सामन्यात पृथ्वीने आज १५९ धावांची खेळी केली, पण दुसऱ्या बाजूला कर्णधार अजिंक्य रहाणेचे अपयश कायम राहिले.

कालपासून सुरू झालेल्या या सामन्यात मुंबईने दिवसअखेर ८६ षटकांत ४ बाद ३१० धावा केल्या. पृथ्वीने १८ चौकार आणि तीन षटकारांचा नजराणा सादर केला. त्याचा सलामीचा साथीदार भूपेन लालवानी यानेही शतक केले; परंतु सर्वात अनुभवी अजिंक्य रहाणे केवळ एका धावेवर बाद झाला.

बाद फेरीतील प्रवेश जवळपास निश्चित झालेल्या मुंबईसाठी आता बाद फेरी हे सराव सामन्यासारखे आहेत. त्यामुळे दडपणमुक्त खेळ करण्याची संधी आहे. पृथ्वी शॉने याच संधीचा फायदा घेत सुरुवातीपासून छत्तीसगडच्या गोलंदाजांवर हल्लाबोल केला. १०२ चेंडूंतच त्याने शतक साजरे केले. त्यावेळी संघाच्या १३६ धावा झाल्या होत्या. वेगवान शतकानंतर पृथ्वी काहीसा संयमी झाला, परिणामी १५९ धावांसाठी त्याने १८५ चेंडूंचा सामना केला.

पृथ्वीचे तुफान धडकत असताना दुसरा सलामीवीर लालवानी केवळ त्याला साथ देण्याची भूमिका पार पाडत होता, पण त्यानंतर त्याने आपलीही शतकी खेळी साकार केली. मोसमातले हे त्याचे दुसरे शतक आहे. पृथ्वीसह त्याने २४४ धावांची सलामी दिली.

२ बाद २८९ अशी भक्कम धावसंख्या असताना आणि कोणतेच दडपण नसताना अजिंक्य रहाणे मैदानात आला; परंतु अवघे चार चेंडू खेळल्यानंतर तो बाद झाला. या मोसमातील दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात तर तो पहिल्याच चेंडूवर बाद झालेला आहे.

धावफलक

मुंबई, पहिला डाव ः ८६ षटकांत ४ बाद ३१० (पृथ्वी शॉ १५९ - १८५ चेंडू, १८ चौकार, ३ षटकार, भूपेन लालवानी १०२ - २३८ चेंडू, १० चौकार, अजिंक्य रहाणे १ - ४ चेंडू, सूर्यांश शेडगे खेळत आहे १७, अनिश चौहान ८४-३)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

SCROLL FOR NEXT