Ranji Trophy Prize Money 
क्रीडा

BCCIने तिजोरी केली खाली, देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांच्या बक्षीस रकमेत बंपर वाढ

रणजी विजेत्यांना मिळणार कोटी

सकाळ ऑनलाईन टीम

Ranji Trophy : भारतीय क्रिकेटमध्ये देशांतर्गत स्पर्धांना प्रचंड महत्त्व आहे. या देशांतर्गत क्रिकेट स्पर्धामधून राष्ट्रीय क्रिकेट संघासाठी अनेक चांगले खेळाडू मिळतात. आता याच देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांच्या बक्षीस रकमेत वाढ करण्यात आली आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव जय शहा यांनी आज पुरुषांच्या रणजी तसेच इतर स्पर्धाच्या बक्षीस रकमेत वाढ केली आहे. याचबरोबर महिलांच्या राष्ट्रीय स्तरावरच्या क्रिकेट स्पर्धेच्या बक्षीस रकमेतसुद्धा वाढ करण्यात आली आहे. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी ट्विट करत पुरुषांच्या तसेच महिलांच्या राष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धाच्या बक्षीस रकमेत वाढ करत असल्याची घोषणा केली.

"मला पुरुषांच्या तसेच महिलांच्या देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांच्या बक्षीस रकमेत वाढीची घोषणा करण्यात अतिशय आनंद होत आहे. बीसीसीआयच्या अख्यारीत होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरच्या पुरुषांच्या आणि महिलांच्या स्पर्धाच्या बक्षीस रकमेत वाढ करण्यात येत आहे.

देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात महत्त्वाची स्पर्धा असणाऱ्या रणजीच्या विजेत्यांना आता पाच कोटी मिळणार आहेत. याआधी रणजीच्या विजेत्यांना तीन कोटी मिळायचे. महिलांच्या एकदिवसीय स्पर्धा जिंकणाऱ्या संघाला आता ५० लाख रुपये बक्षीस मिळणार आहे. याआधी महिलांच्या राष्ट्रीय स्पर्धा जिंकणाऱ्या संघाला सहा लाख रुपये मिळायचे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multibagger Stock: 1 लाखाचे झाले 8.50 लाख! शेअर बाजार लाल, पण या शेअरने केले मालामाल; 9 महिन्यांत तब्बल 700% रिटर्न

IND vs WI, 2nd ODI: दुसऱ्या सामन्यापूर्वीच मोठी बातमी! पहिल्या वनडेत शतक केलेला खेळाडू संघातून बाहेर, कारण काय?

'जैसे तू है पास मेरे तेरे पास मे' योगिता चव्हाणचा डान्स पाहिलात का? स्टेप्स आणि एक्सप्रेशन पाहून नेटकरी म्हणाले...Viral Video

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

SCROLL FOR NEXT