ranji trophy shivam dube bowling contribution to victory to mumbai team bihar Sakal
क्रीडा

Ranji Trophy : मुंबईचा संघ विजयाच्या दिशेने, बिहार संघाचा पाय खोलात; शिवम दुबेची प्रभावी गोलंदाजी

सर्वाधिक वेळा रणजी विजेता बनलेला मुंबईचा क्रिकेट संघ यंदाच्या मोसमातील पहिल्याच लढतीत विजयाच्या उंबरठ्यावर उभा आहे.

सकाळ वृत्तसेवा

पाटना : सर्वाधिक वेळा रणजी विजेता बनलेला मुंबईचा क्रिकेट संघ यंदाच्या मोसमातील पहिल्याच लढतीत विजयाच्या उंबरठ्यावर उभा आहे. पहिल्या डावात २५१ धावा केल्यानंतर बिहारचा पहिला डाव १०० धावांवर गुंडाळून फॉलोऑन लादणाऱ्या मुंबईसमोर बिहारची दुसऱ्या डावात ६ बाद ९१ धावा अशी अवस्था झाली आहे.

मुंबईच्या संघाने एलिट ब गटातील लढतीत डावाने विजय मिळवण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. यजमान बिहारच्या संघाला डावाने पराभवाची नामुष्की टाळण्यासाठी ६० धावांची आवश्‍यकता आहे.

बिहारने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. कर्णधार अजिंक्य रहाणे, तुषार देशपांडे यांच्या अनुपस्थिती मुंबईचा संघ मैदानात उतरला. बलाढ्य मुंबईला पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभारता आली नाही.

त्यांना पहिल्या डावात २५१ धावाच करता आल्या. भूपेन लालवानी, सुवेद पारकर व शिवम दुबे यांनी अर्धशतकी खेळी साकारत मुंबईसाठी मोलाची कामगिरी बजावली. बिहारच्या गोलंदाजांनी मुंबईच्या फलंदाजांना बांधून ठेवताना उल्लेखनीय कामगिरी केली; पण बिहारच्या फलंदाजांना ठसा उमटवता आला नाही.

मोहित अवस्थीच्या प्रभावी गोलंदाजीसमोर बिहारचा पहिला डाव ४४.५ षटकांत १०० धावांवरच आटोपला. शनिवारी, लढतीच्या दुसऱ्या दिवशी बिहारची अवस्था पहिल्या डावात ६ बाद ८९ धावा अशी झाली होती.

भारताच्या उत्तर विभागात हिवाळ्यात धुक्यामुळे समस्या निर्माण होते. त्याच कारणामुळे रविवारी सामन्याला दोन तास उशिरा सुरुवात झाली. मोहित अवस्थीने २७ धावा देत ६ फलंदाज बाद केले.

संक्षिप्त धावफलक ः मुंबई - पहिला डाव सर्व बाद २५१ धावा वि. बिहार - पहिला डाव सर्व बाद १०० धावा (आकाश राज ३२, मोहित अवस्थी ६/२७) आणि दुसरा डाव (फॉलोऑननंतर) ६ बाद ९१ धावा (शिवम दुबे ४/७).

फॉलोऑनची नामुष्की

मुंबईकडून बिहारच्या संघावर फॉलोऑन लादण्यात आला. अष्टपैलू खेळाडू शिवम दुबेच्या प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर मुंबईने तिसऱ्या दिवसअखेरीस बिहारची अवस्था ६ बाद ९१ धावा अशी केली. शिवम दुबेने १० षटके गोलंदाजी करताना ७ धावांच्या मोबदल्यात चार फलंदाजांना बाद केले. बिहारकडून शर्मन निगरोधने ४० धावांची आणि बिपिन सौरभने नाबाद ३० धावांची खेळी केली. आता या लढतीचा चौथा दिवस उद्या (ता. ८) असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Leopard Attack : कुत्र्यांनी वाचवले मालकाचे प्राण! मेंढपाळांवर बिबट्याचा हल्ला; मात्र कुत्र्यांनी केलेला हल्ल्यात बिबट्याचा मृत्यू

Thane Traffic: बाप्पाच्या आगमनात खड्ड्यांचे विघ्न! मार्गावर तब्बल ८०० खड्ड्यांच साम्राज्य

Pune Election: नव्या प्रभाग रचनेमुळे १६ प्रभागांमध्ये गडबड; ६४ नगरसेवकांवर थेट परिणाम; 'या' पक्षांना बसणार फटका

Pune News : पतीला अर्ध यकृत दिल, प्रत्यारोपणनंतर पत्नीसह दोघांचाही मृत्यू; पुण्यातील रुग्णालयात घटनेने खळबळ

दोन महिन्यात उजनीतून सोडले 97 TMC पाणी! उजनी धरणाचे 16 दरवाजे 3 फुटाने उघडले; भीमा नदीतील विसर्ग 45 हजार क्युसेक, पंढरीतील पूरस्थिती आज पूर्वपदावर

SCROLL FOR NEXT