Rassie van der Dussen Credited IPL For South Africa 1st Win Against India In T20I Series  esakal
क्रीडा

दुसेनने दक्षिण आफ्रिकेच्या विजयाचे आयपीएलला दिले 'श्रेय'

अनिरुद्ध संकपाळ

नवी दिल्ली : रासी वेन डेर दुसेनने भारताविरूद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यात संथ सुरूवातीनंतर धमाका केला. त्याने 75 धावांची खेळी करत भारताचे 212 धावांचे आव्हान पार करण्यात मोलाचा वाटा उचलला. गुजरात टाटन्सच्या आयपीएल विजेतेपदात मोलाचा वाटा उचलणाऱ्या डेव्हिड मिलरने देखील 64 धावांची नाबाद भागीदारी रचत संघाला वियचापर्यंत पोहचवले. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी नाबाद 131 धावांची भागीदारी रचली. दक्षिण आफ्रिकेने भारताचा सलग 13 वा टी 20 सामना जिंकून वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचा मनसुबा देखील उधळून लावला. (Rassie van der Dussen Credited IPL For South Africa 1st Win Against India In T20I Series)

विशेष म्हणजे भारताला मात देणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या संघातील 10 खेळाडू नुकत्याच झालेल्या आयपीएलच्या 15 व्या हंगामात खेळले आहे. यात पहिल्या सामन्याचे हिरो दुसेन आणि मिलर यांचा देखील यात समावेश आहे. दुसेन राजस्थान रॉयल्सकडून 3 सामन्यात खेळला आहे. तर डेव्हिड मिलर आयपीएल विजेत्या गुजरात टायटन्सचा प्रमुख खेळाडू होता. त्याने 16 सामन्यात 481 धावा केल्या आहेत.

दरम्यान दुसेन आयपीएलबाबत बोलताना म्हणाला की, 'मी आयपीएलचे अनेक सामने पाहिले आहेत. मला अंतिम 11 च्या संघात जरी खेळण्याची संधी मिळालेली नसली तरी त्यांचे गोलंदाज काय क्षमतेचे आहेत याचा अंदाज मला आहे. मी भारतीय कंडिशनमध्ये दोन महिने घालवले आहेत. आमच्या संघातील बऱ्याच खेळाडूंनी यंदाच्या आयपीएलमध्ये भाग घेतला होता. त्यामुळे पहिल्या सामन्यात परिस्थितीशी जुळवून घेण्यात आम्हाला काहीच अडचण आली नाही.'

दक्षिण आफ्रिकेने पाच टी 20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता मालिकेतील दुसरा सामना कटक येथे 12 जूनला होणार आहे. टीम इंडियाचा कर्णधार केएल राहुल दुखापतग्रस्त झाल्याने संघाच्या नेतृत्वाची धुरा ऋषभ पंतच्या खांद्यावर आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT