Ravi Bishnoi T20 World Cup India Squad
Ravi Bishnoi T20 World Cup India Squad ESAKAL
क्रीडा

Ravi Bishnoi : T20 वर्ल्डकप संघात स्थान न मिळालेल्या बिश्नोईची इन्स्टा स्टोरी आली चर्चेत

अनिरुद्ध संकपाळ

Ravi Bishnoi T20 World Cup India Squad : ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी 20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची घोषणा काही दिवसांपूर्वीच झाली. या संघात अनेक दर्जेदार खेळाडूंना जागा मिळवता आली नाही. भारताच्या अनेक खेळाडूंना गेल्या काही टी 20 मालिकांमध्ये आजमावून पाहण्यात आले. त्यातील काहींनी चांगली कामगिरी करून देखील त्यांना संघात स्थान मिळाले नाही. भारताचा लेगस्पिनर रवी बिश्नोई देखील यात श्रेणीत मोडतो. दरम्यान, मोहम्मद शमी, दीपक चाहर, श्रेसय अय्यर आणि रवी बिश्नोई यांनी टी 20 वर्ल्डकप संघासाठी स्टँड बाय म्हणून ठेवण्यात आले आहे.

रवी बिश्नोईने आशिया कपमध्ये आपल्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले होते. मात्र वर्ल्डकप संघात त्याला स्थान मिळाले नाही. त्यानंतर त्याने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. त्याने 'सूर्य पुन्हा उगवेल आणि आम्ही पुन्हा प्रयत्न करू' अशी सकारात्मक वृत्ती दर्शवणारी स्टोरी इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केली. टी 20 वर्ल्डकप संघात रविचंद्रन अश्विन आणि युझवेंद्र चहल हे दोन प्रमुख फिरकीपटू असतील. त्यांच्या जोडीला अष्टपैलू म्हणून डावखुरा अक्षर पटेल देखील संघात असणार आहे.

दरम्यान, आशिया कपमधील बहुतांश संघ हा टी 20 वर्ल्डकपसाठी देखील तसाच ठेवण्यात आला आहे. दुखापतग्रस्त रविंद्र जडेजाच्या जागी अक्षर पटेलला संधी मिळाली आहे. तर जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल हे दोन वेगवान गोलंदाज दुखापतीनंतर संघात परतले आहेत. त्यांनी रवी बिश्नोई आणि आवेश खान यांची जागा घेतली. रोहित शर्मा पहिल्यांदाच आयसीसी स्पर्धेत भारताचे नेतृत्व करणार आहे. त्याचा सलामीवीर पार्टनर केएल राहुल उपकर्णधार असेल.

भारताचा ICC T20 World Cup 2022 साठीचा संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, ऋषभ पंत (विकेट किपर), दिनेश कार्तिक (विकेट किपर), हार्दिक पांड्या, आर. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.

स्टँड बाय : मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चाहर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: तेव्हा अजित पवार नवखे होते, २००४ साली मुख्यमंत्री पदाची संधी का घालवली? शरद पवारांनी सांगितला माइंड गेम

Weight Gain Foods : ‘या’ खाद्यपदार्थांचे सेवन केल्याने झपाट्याने वाढू शकते वजन, खाण्यापूर्वी जरूर करा विचार

गोफण | 'बिनशर्त'ची सुपारी दणक्यात वाजली!

MS Dhoni : MS धोनीमुळे हरली CSK? 'या' मोठ्या चुकीमुळे प्लेऑफचे तिकीट गेलं हातातून

Nancy Tyagi: 30 दिवस, 1000 मीटर कापड अन् 20 किलो वजन; कान चित्रपट महोत्सवात परिधान केला स्वत: शिवलेला ड्रेस, नॅन्सी त्यागी आहे तरी कोण?

SCROLL FOR NEXT