Ravi Dahiya, Bajrang Punia among six wrestlers selected to represent country in CWG 2022 esakal
क्रीडा

Commonwealth Games 2022 साठी बजरंग पुनिया, रवि दहिया यांची निवड

भारतीय क्रीडा प्राधिकरण आणि कुस्ती महासंघाने 22 व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय कुस्ती संघाची घोषणा केली आहे.

धनश्री ओतारी

भारतीय क्रीडा प्राधिकरण आणि कुस्ती महासंघाने 22 व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय कुस्ती संघाची घोषणा केली आहे. 28 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीत बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या या कॉमनवेल्थ गेम्समध्ये कुस्तीसह अनेक खेळांच्या विविध श्रेणींमध्ये खेळाडू सहभागी होणार आहेत. भारतीय कुस्ती महासंघाने मंगळवारी निवड चाचणीचे आयोजन केले होते, त्यानंतर 6 भारतीय खेळाडूंनी पुरुष गटासाठी 6 खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत.

भारतीय कुस्ती महासंघाने बजरंग पुनिया आणि रवी दहियासह 6 खेळाडूंना संघात स्थान दिले आहे. तर महिला गटात पूजा राणी, विनेश फोगट, अंशू, साक्षी मलिक, दिव्या आणि पूजा गेहलोत यांना स्थान मिळाले आहे. दुसरीकडे, मुस्कान, रितिका, श्रुती, अहिल्या, रीना, शिक्षा, सविता, पुलकित, मानसी आणि प्रिया यांची किर्गिस्तानमध्ये होणाऱ्या आशियाई चॅम्पियनशिप 2022 साठी संघात निवड झाली आहे.

राष्ट्रकुल स्पर्धेसाठी निवडलेल्या कुस्ती संघात 50किलो गटात पूजा गेहलोत, 53 किलो गटात विनेश फोगट, 62 किलो गटात अंशू मलिक, 68 किलो गटात दिव्या करण आणि 76 किलो गटात पूजा धांधा यांचा समावेश आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंबाबत बोलायचे झाले तर या खेळाडूंच्या नावांचाही समावेश आहे.

बर्मिंगहॅम 2022 मध्ये खेळल्या जाणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत क्रिकेट खेळण्याची ही दुसरी वेळ असेल. कॉमनवेल्थ गेम्समधील क्रिकेट प्रथम क्वालालंपूर 1998 मध्ये आयोजित करण्यात आले होते, जिथे पुरुष संघाचा एकदिवसीय प्रकार खेळला गेला होता, त्यानंतर या वर्षी महिला क्रिकेट टी-20 फॉरमॅटमध्ये खेळले जाईल, ज्यामध्ये यजमान इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, भारत, पाकिस्तान, द. आफ्रिका, बार्बाडोस आणि श्रीलंका सहभागी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईत सेनाभवनासमोर राडा! शिवसैनिक पोलिसांच्या ताब्यात, आदित्य-तेजस ठाकरे आक्रमक

CJP Protest Streets Again : "आंदोलन करणार नाही अशी कोणत्याच बॉण्डवर सही केली नाही; पुन्हा रस्त्यावर उतरणार!"; अभिजीत दिपके यांचा थेट इशारा

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

Beed Jeweller Fraud: साेन्याची मोड तपासली, तरी फसवणूक झाली; धारूरच्या सराफाला १७.५० लाखांना गंडा, नेमकं काय घडलं?

Someshwar Sugar Factory: सोमेश्वर कारखान्याच्या मतमोजणीसाठी वाहतुकीत बदल; बारामती-निरा मार्गावरील रस्ता २४ तास बंद, नेमका कसा असेल बदल?

SCROLL FOR NEXT