Ravi Kumar Dahiya Won Gold Medal In 57 Kg Freestyle Wrestling In Commonwealth Games 2022 esakal
क्रीडा

CWG 2022 : रवी दहियाचा विजयी शड्डू! कुस्तीत सुवर्णाचा चौकार

अनिरुद्ध संकपाळ

Commonwealth Games 2022 : भारताचा कुस्तीपटू रवी कुमार दहियाने पुरूष 57 किलो वजनी फ्रीस्टाईल गटात सुवर्ण पदक पटकावले. त्याने नायजेरियाच्या एबिकेनेनिमो वेल्सनचा 10 - 0 असा पराभव केला. भारताचे हे यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेतील कुस्तीतील चौथे तर एकूण 10 वे सुवर्ण पदक आहे. रवी कुमार दहियाची ही पहिलीच राष्ट्रकुल स्पर्धा होती त्याने पहिल्याच स्पर्धेत फायनल पर्यंत धडक मारली होती.

रवी दहियाने सुरूवातीपासूनच आक्रमक खेळ करत नायजेरियाच्या कुस्तीपट्टूवर आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न केला. त्याला संधी मिळताच रवी दहियाने गटरेज डाव खेळत पहिल्या फेरीत 8 गुण मिळवले. त्यानंतर त्याने दुसऱ्या सत्रात उरलेले दोन गुण मिळवत तांत्रिक सरसतेवर सामना 10 - 0 असा जिंकला.

भारताच्या पूजा गेहलोतने स्कॉटलँडच्या ख्रिस्टलेचा 12 - 2 असा पराभव करत महिला 50 किलो फ्रीस्टाईलमध्ये कांस्य पदक पटकावले. कुस्तीमधून भारताला मिळालेले हे दुसरे कांस्य पदक आहे. दिल्लीची पूजा ही पहिल्यांदाच राष्ट्रकुल स्पर्धेत खेळत होती. भारताने कुस्तीत आतापर्यंत चार सुवर्ण, एक रौप्य आणि तीन कांस्य अशी एकूण 11 पदके पटकवाली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Road Accident : नववर्षाची पहाट भीषण अपघाताने, कोल्हापुरात भरधाव इनोव्हाने चिरडल्याने तिघांचा जागीच मृत्यू

शिवसेनेला दणका! अहिल्यानगरमध्ये पाच एबी फॉर्म बाद; राष्ट्रवादीचे कुमारसिंह वाकळेंचा मार्ग सोपा, विराेधकांना होणार फायदा!

संजय दत्तचे 5 प्रेम प्रकरणं! ज्यांनी बॉलिवूडमध्ये घातलेला धुमाकूळ, माधुरी दीक्षितसोबत तर होणार होतं लग्न

Aries Horoscope : 'मेष राशी'ला साडेसाती सुरू; कसं असणार नवीन वर्ष? घाई-गडबडीत कोणतेही निर्णय घेतल्यास काय होणार?

PCMC Election: बंडखोरी टाळण्यासाठीचा डाव भाजपवरच कसा उलटला? पिंपरी चिंचवडमध्ये नेमकं काय घडलं? ‘राष्ट्रवादीं’ची आघाडी यशस्वी?

SCROLL FOR NEXT