Ravi Shastri IPL 2023  esakal
क्रीडा

Ravi Shastri IPL 2023 : रवी शास्त्री पुन्हा गोंधळले; अजूनही WPL चाच हँगओव्हर

अनिरुद्ध संकपाळ

Ravi Shastri IPL 2023 : आयपीएलच्या 16 व्या हंगामाची अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दणक्यात सुरूवात झाली. गुजरात टायटन्स विरूद्ध चेन्नई सुपर किंग्जच्या सामन्यापूर्वी जबरदस्त उद्घाटन सोहळा पार पडला. त्यानंतर रवी शास्त्रींच्या उपस्थितीत हार्दिक पांड्या आणि महेंद्रसिंह धोनीने नाणेफेक केली.

याचवेळी रवी शास्त्रींनी समालोचन करताना एक चूक केली. रवी शास्त्रींनी भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाचा काळ संपल्यानंतर समालोचन सुरू केले आहे. मात्र समालोचनाच्या दुसऱ्या इनिंगमध्ये त्यांच्याकडून काही चुका होत आहेत.

रवी शास्त्रींनी पहिल्या सामन्याच्या नाणेफेकीवेळी समालोचन करताना चुकून गुजरात टायटन्सचे नाव गुजरात जायंट्स असे घेतले. गुजरात जायंट्स हा संघ नुकत्याच पार पडलेल्या वुमन प्रीमियर लीगमध्ये सहभागी झाला होता. रवी शास्त्रींनी या संघाचे नाव घेत ते अजूनही महिला प्रीमियर लीगच्या हँगओव्हरमधून बाहेर पडलेले नसल्याचे सिद्ध केले. दरम्यान, रवी शास्त्रींनी आपल्या समालोचनात चूक केल्यांनतर गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याला आपले हसू आवरता आले नाही.

आयपीएलच्या 16 व्या हंगामातील पहिल्या सामन्यात नाणेफेक जिंकून गुजरातने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नईचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडने केलेल्या 92 धावांचा दमदार खेळीच्या जोरावर चेन्नईने 20 षटकात 7 बाद 178 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना गुजरातला शुभमन गिलने (63 धावा) दमदार सुरूवात करून दिली.

मात्र पदार्पण करणाऱ्या राजवर्धन हंगरगेकरने गुजरातला एका मागून एक असे तीन धक्के दिले. मात्र मोक्याच्या क्षणी गुजरातने आपला डाव सावरला. राहुल तेवतियाने 15 तर राशिद खानने 3 चेंडूत 10 धावा ठोकत गुजरातला अखेरच्या षटकात विजय मिळवून दिला.

(Sports Latest News)

हेही वाचा : महिलांनो तरुणपणी घेतलेली जमीन उतारवयात होईल आधार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Dindori Car Accident : नाशिकच्या दिंडोरीत कार विहिरीत कोसळली, ७ विद्यार्थ्यांसह ९ जणांचा दुर्दैवी अंत, ​स्नेहसंमेलन आटोपून घरी परतताना घटना

CSK vs PBKS Live: चेन्नई सुपर किंग्स 'घरी'पण हरले! पंजाब किंग्सचे फलंदाज चेपॉकवर बरसले, श्रेयसचा संघ IPL 2026 Point Table मध्ये अव्वल

Maharashtra co-op directive: सहकार खात्याचा नवा आदेश; पिग्मी एजंटचे कमिशन २.५ टक्क्यांवर मर्यादित, हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर गदा

Elderly rights in Umarga: ‘माता-पिता व ज्येष्ठ नागरिक अधिनियम’चा प्रभावी वापर : मुरूमच्या ७४ वर्षीय आईला चारही मुलांकडून दरमहा १२ हजार निर्वाहभत्ता

Akola mining dispute: अप्पर जिल्हाधिकाऱ्यांवर बेकायदेशीर रकमेच्या मागणीचा आरोप; एमआयडीसी पोलिस ठाण्यात खाण-क्रशर उद्योजक संघाची तक्रार

SCROLL FOR NEXT