Ravichandran Ashwin IND vs AUS 2nd Test esakal
क्रीडा

Ravichandran Ashwin : अश्विन @100! जे शेन वॉर्नलाही जमलं नाही ते अश्विननं करून दाखवलं

अनिरुद्ध संकपाळ

Ravichandran Ashwin IND vs AUS 2nd Test : भारताने पहिल्या कसोटीप्रमाणे दुसऱ्या कसोटीत देखील नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाला पहिल्याच दिवशी पाणी पाजले. भारताकडून फिरकीपटू आर. अश्विनने भेदक मारा करत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीला पहिल्यापासूनच खिंडार पाडण्यास सुरूवात केली.

विशेष म्हणजे आर अश्विनने आजच्या सामन्यात मार्नस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ आणि अॅलेक्स केरीची शिकार केली. केरीची शिकार अश्विनसाठी खास होती. त्याने केरीला शुन्यावर बाद केलेच याचबरोबर अश्विनची ही कसोटीतील 100 वी ऑस्ट्रेलियन शिकार ठरली. या विकेटबरोबरच अश्विन ऑस्ट्रेलिया विरूद्ध भारत कसोटी सामन्यांमध्ये 100 पेक्षा जास्त विकेट्स घेणारा दुसरा खेळाडू ठरला. यापूर्वी भारताच्या अनिल कुंबळेने ऑस्ट्रेलियाविरूद्ध 111 विकेट्स घेतल्या आहेत.

लंचनंतर ट्रॅव्हिस हेड आणि उस्मान ख्वाजा यांनी डाव सावरत भागीदारी रचण्याचा प्रयत्न केला. मात्र शमीने हेडला 12 धावांवर माघारी धाडले. त्यानंतर उस्मानने झुंजार खेळी करत कांगारूंना 150 च्या पार पोहचवले. मात्र रविंद्र जडेजाने उस्मान ख्वाजाला 81 धावांवर बाद करत कांगारूंना मोठा धक्का दिला. या विकेटमध्ये केएल राहुलने भन्नाट कॅच पकडत मोलाची भुमिका बजावली.

पहिल्या कसोटीप्रमाणे दुसऱ्या कसोटीत देखील नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाची अवस्था खराब झाली. भारतीय गोलंदाजांनी कांगारूंच्या फलंदाजीला खिंडार पाडत पहिल्या सत्राच्या दुसऱ्या दिवशीच कांगारूंची अवस्था 6 बाद 164 धावा अशी केली. भारताकडून अश्विनने 3 रविंद्र जडेजाने 1 आणि मोहम्मद शमीने 2 विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियाकडून सलामीवीर उस्मान ख्वाजाने 81 धावांची धडाकेबाज खेळी केली.

(Sports Latest News)

वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT