आर अश्विन  आर अश्विन
क्रीडा

IND Vs NZ : रविचंद्रन अश्विनने तोडला हरभजन सिंगचा रेकॉर्ड

सकाळ डिजिटल टीम

कानपूर : इंडिया (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यात खेळला जात असलेल्या पहिल्या कसोटीचा आज पाचवा दिवस आहे. १२३ धावांवर किवी संघाचे तीन खेळाडू बाद झाले आहे. या कसोटीचा निकाल काय लागेल हे आताच सांगता येणार नाही, मात्र आर. अश्विन (Ravichandran Ashwin) भारताकडून सर्वाधिक गडी बाद करणारा दुसरा फिरकी गोलंदाज ठरला आहे. यासह त्याने फिरकीपटू हरभजन सिंगला (Harbhajan Singh) मागे टाकले आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेली कानपूर कसोटी शेवटच्या दिवशी रोमांचक वळणावर पोहोचली आहे. न्यूझीलंडला विजयासाठी २८४ धावांची गरज आहे. पाचव्या दिवशी न्यूझीलंडने तीन गडी गमावून १२३ धावा काढलेल्या आहे. पाचव्या दिवसाच्या सुरुवातीला भारतीय संघाच्या गोलंदाजांना कोणतीही चमत्कारिक कामगिरी करता आली नाही.

कानपूर कसोटीतून रविचंद्रन अश्विनने टीम इंडियात पुनरागमन केले. टॉम लॅथमला अश्विनने पायचीत करीत बाद केले. यासह रविचंद्रन अश्विनने सर्वाधिक विकेट घेण्याच्या बाबतीत हरभजन सिंगचा विक्रम मोडला आहे. रविचंद्रन अश्विन आता कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा भारताचा तिसरा गोलंदाज ठरला आहे. अनिल कुंबळे ६१९ बळी घेऊन भारताकडून पहिल्या स्थानावर कायम आहे.

भारतासाठी सर्वाधिक कसोटी बळी

  • अनिल कुंबळे - ६१९

  • कपिल देव - ४३४

  • रविचंद्रन अश्विन - ४१८

  • हरभजन सिंग - ४१७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amul Milk Price Hike : अमुल, मदर डेअरीचे दूध महागले; प्रतिलिटर ४ रुपयांपर्यंत वाढ, ग्राहकांना बसणार फटका

Swachh Survekshan 2025-26 : देशातील सर्वात स्वच्छ ठरले महाराष्ट्रातील 'हे' शहर; ४,७५१ शहरांना मागे टाकत पटकावला पहिला क्रमांक

BCCI News: IPL 2028 मध्ये 12 संघाची स्पर्धा? BCCI सचिवांचे संघ वाढीवर मोठं विधान

Latest Marathi News Live Update: नवजात बाळ विक्री प्रकरणी डॉक्टर भोजने दाम्पत्याला अटक

Akola News: श्वान नसबंदीच्या कंत्राटावर प्रश्नचिन्ह; लाखो रुपये खर्चूनही नियंत्रण कुठे?, कागदोपत्रीच कारभार

SCROLL FOR NEXT