Ravichandran Ashwin IND vs PAK Hockey ESAKAL
क्रीडा

Ravichandran Ashwin Hockey : अश्विन मानलं तुला! विदेशात फिरण्यापेक्षा 'उपस्थिती'नं हॉकी संघाला दिला पाठिंबा

अनिरुद्ध संकपाळ

Ravichandran Ashwin IND vs PAK Hockey : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्वंद्व आज चेन्नईत रंगलं. मैदान होतं एशियन हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 चं! भारताने आपल्या कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 4 - 0 असा सहज पराभव करत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. भारताकडून हमनप्रीत सिंहने सर्वाधिक दोन गोल केले. तो सामन्याचं आकार्षण ठरलाचं मात्र भारताचा अव्वल फिरकीपटू आर अश्विनने देखील सर्वांचे लक्ष वेधले. (Asian Hockey Championship 2023)

वेस्ट इंडीज दौऱ्यावरील कसोटी मालिकेत दमदार गोलंदाजी करणारा अश्विन सध्या ब्रेकवर आहे. मात्र हा विश्रांतीचा काळ विदेशात फिरण्यात न घालवता त्याने चेन्नईत झालेल्या भारत - पाकिस्तान या हाय व्होल्टेज सामन्यात भारतीय संघाचा उत्साह वाढवण्यात घालवला. भारताच्या हॉकी संघाला प्रोत्साहन देणाऱ्या अश्विनचं कौतुक होत आहे. (India Vs Pakistan)

चेन्नईतील भारत पाकिस्तान सामन्यावेळी अश्विनने देखील आपली उपस्थिती दर्शवली. तो सामना सुरू होण्यापूर्वी तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्यासोबत मंचावर आला. यावेळी अश्विन आणि स्टॅलिन यांनी मैदानावरील खेळाडूंची भेट घेतली. अश्विनने उभे राहून राष्ट्रगीत देखील म्हटले.

भारतीय हॉकी संघ सध्या एशियन चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दमदार कामगिरी करत आहे. पहिल्या सामन्यात भारताने चीनचा 7 - 2 असा पराभव केला होता. त्यानंतर जपानविरूद्धचा सामना 1 - 1 असा ड्रॉ राहिला होता. यानंतर भारतीय संघाने मलेशियाचा 5 - 0 ने पराभव केला.

दुसरीकडे पाकिस्तानला आतापर्यंत फक्त एकच सामना जिंकता आला आहे. त्यांनी चीनचा 2 - 1 असा पराभव केला होता. त्यानंतर दक्षिण कोरियाविरूद्धचा सामना ड्रॉ झाला होता.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Wani News : सप्तशृंगगडावर आज रंगणार कोजागरीचा महासोहळा; कावड यात्रेसह तृतीयपंथीयांचा छबिना उत्सव

Aapli ST App : बस स्टँडवर एसटीची वाट बघत थांबताय? तुमचं टेन्शन मिटलं! ‘Aapli ST’ अ‍ॅपवर कळणार Live लोकेशन, पण कसं? पाहा एका क्लिकवर

थैलावाचा साधेपणा! रस्त्यावर केलं जेवण, कामातून घेतला आध्यात्मिक ब्रेक

Mud Volcano: अंदमानमधील चिखलाचा ज्वालामुखी सक्रिय; भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभाग पाठवणार संशोधन पथक

Ahilyanagar News:'अहिल्यानगर शहरात प्रेम विवाहातून प्राणघातक हल्ले वाढले'; जोडप्यांचा टोकाचा निर्णय..

SCROLL FOR NEXT