ravichandran ashwin wife prithi narayanan shares emotional Instagram post ind vs eng 500 test wickets  
क्रीडा

R Ashwin Wife Post : अश्विनच्या पत्नीची इंस्टाग्रामवर इमोशनल पोस्ट; म्हणाली, आमच्या आयुष्यातील ते सर्वात कठीण 48 तास...

Ashwin wife Prithi Narayanan emotional Instagram post: इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत भारतीय संघाने 434 धावांनी दमदार विजय मिळवला. धावांच्या बाबतीत भारताचा हा सर्वात मोठा कसोटी विजय आहे.

रोहित कणसे

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत भारतीय संघाने 434 धावांनी दमदार विजय मिळवला. धावांच्या बाबतीत भारताचा हा सर्वात मोठा कसोटी विजय आहे. भारताचा दिग्गज फिरकीपटू आर अश्विनसाठी राजकोट कसोटी थोडीशी खास आणि काहीशी तणावपूर्ण ठरला. (Ravichandran Ashwin wife Prithi Narayanan shares emotional Instagram post)

सामन्याच्या दुसऱ्या दिवशी (16 फेब्रुवारी) त्याने झॅक क्रॉलीला बाद करून 500 कसोटी विकेट्स पूर्ण केल्या. मात्र अश्विनला आपला 500वा बळी मिळवल्यानंतर लगेचच आईच्या आजारपणामुळे सामना अर्ध्यावरच सोडावा लागला. त्यानंतर चौथ्या दिवशी टी ब्रेकनंतर तो मैदानात परतला आणि त्याने टॉम हार्टलीला बाद करत 501वी विकेट घेतली.

अश्विनची पत्नी प्रीती नारायण यांनी अश्विनच्या या यशाबद्दल इन्स्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

प्रीतीने लिहिले की, "आम्ही हैदराबादमध्ये (पहिली कसोटी) 500 व्या विकेटचा पाठलाग करत होतो पण तसे झाले नाही. विशाखापट्टणम (दुसरी कसोटी) येथेही ते शक्य झालं नाही नाही. 499 झाल्यानंतर मी भरपूर मिठाई विकत घेतली आणि घरी सगळ्यांना वाटली. 500 वी विकेट आली आणि शांततेत निघून गेली. जोपर्यंत तसं होत नाही. 500 ते 501 च्या दरम्यान बरंच काही घडलं. आमच्या आयुष्यातील ते सर्वात कठीण 48 तास होते. पण हे सर्व 500व्या विकेटबद्दल आहे. आणि त्याआधीच्या सुमारे 499 बद्दल. काय अप्रतिम कामगिरी आहे. काय विलक्षण माणूस आहे. अश्विन, मला तुझा खूप अभिमान आहे आणि आम्ही तुझ्यावर प्रेम करतो!"

कसोटीत 500 किंवा त्याहून अधिक विकेट्स घेणारा अश्विन भारताचा दुसरा आणि नववा गोलंदाज आहे. अश्विनने मोठा इतिहास रचला आहे. सर्वात जलद 500 कसोटी बळी घेणारा तो दुसरा गोलंदाज ठरला आहे. अनिल कुंबळे आणि शेन वॉर्न सारख्या दिग्गजांचा विक्रम त्याने मोडला आहे.

अश्विनने 98व्या सामन्यात इतक्या विकेट्स घेतल्या, तर कुंबळेने 105 आणि वॉर्नने 108 कसोटी सामन्यात इतक्या विकेट्स घेतल्या. त्याखालोखाल ग्लेन मॅकग्रा (108) आणि नाथ लियोन (123) यांचा क्रमांक लागतो. कसोटीत सर्वात जलद 500 कसोटी बळी घेण्याचा विक्रम आजही श्रीलंकेचा माजी फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनच्या नावावर आहे. त्याने 87 कसोटी सामन्यांत ही कामगिरी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Cyber Fraud: विधवेची सरकारी मदत सायबर भामट्याने लांबवली; सिम कार्डाच्या सहाय्याने खाते केले लिंक

Latest Marathi News Live Update : निलेश घायवळच्या अडचणी वाढणार? आणखी एक गुन्हा दाखल होण्याची शक्यता...

Beed News: पेट्रोलमध्ये आढळले पाणी; बीड शहरातील पंपावर नागरिक झाले संतप्त

RSS 100 Years : सोलापुरात २२७० स्वयंसेवकांचे पथसंचलन; अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी; राष्ट्रीय पंचसूत्रीची घोषणा

Pankaja Munde: पण, आमच्या लेकरांच्या ताटातले घेऊ नका;आरक्षणावरून पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांचे मत

SCROLL FOR NEXT