Ravindra Jadeja 
क्रीडा

IPL Retention : जड्डूच्या कमेंटवर CSK चा रिप्लाय

चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि रविंद्र जाडेजा यांच्यात 'सवाल-जवाब' चर्चेत आला आहे.

सुशांत जाधव

इंडियन प्रीमियर लीग (IPL 2022) च्या आगामी हंगामासाठी खेळाडू रिटेन करण्यासाठी बीसीसीआयने (BCCI) फ्रेंचायझींना 30 नोव्हेंबरपर्यंत मुदत दिलीये. जुन्या आठ संघांना मेगा लिलावापूर्वी प्रत्येकी 4 खेळाडू रिटेन करता येणार आहेत. बीसीसीआयच्या नियमावलीनुसार प्रत्येक फ्रेंचायझी नव्या संघ बांधणीसाठी रणनिती आखत आहे. काही फ्रेंचायझींनी नावे निश्चितही केली आहेत. कोणता संघ कोणत्या खेळाडूंना रिटेन करणार यासंदर्भात सोशल मीडियावरही जोरदार चर्चा सुरु आहे. दरम्यान चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि रविंद्र जाडेजा यांच्यात 'सवाल-जवाब' चर्चेत आला आहे.

चेन्नई सुपर किंग्जने ट्विटरच्या माध्यमातून एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी चार खेळाडू रिटेन करण्यासाठी चाहत्यांचा कल पाहण्याचा प्रयत्न केलाय. चाहत्यांना मतदानाच्या माध्यमातून आपली पसंती कळवावी, अशा आशयाची पोस्ट चेन्नई सुपर किंग्जने केलीये. जाडेजाने सीएसकेच्या ट्विटर रिअ‍ॅक्शन दिलीये. त्याने लिहिलंय की 'मला ही सांगाव लागेल का? यावर चेन्नई सुपर किंग्जने त्याला प्रत्युत्तर दिले आहे. सध्याच्या घडीला त्याची गरज नाही, असे फ्रेंचायझींनी म्हटलं आहे.

विद्यमान चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्ज कर्णधार महेंद्रसिंह धोनीला रिटेन करणार हे जवळपास निश्चित आहे. पुढच्या तीन वर्षांसाठी तो संघात कायम राहिल. धोनीशिवाय रविंद्र जाडेजा आणि सलामीवीर ऋतूराज गायकवाड यालाही रिटेन करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. चौथा खेळाडू ड्वेन ब्रावो असणार का याबाबत अद्याप संभ्रम आहे. त्याने नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृती घेतलीये. आयपीएलमध्ये तो खेळणार की नाही हे देखील पाहावे लागेल. जर त्याने व्यावसायिक क्रिकेट खेळण्याचं ठरवलं तर तोही चेन्नईच्या ताफ्यात सहभागी दिसू शकेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune: राजकारणात मोठा ट्विस्ट! काकांनी नाकारलं; पवार–शिंदे युतीमुळे नवं समीकरण तयार होणार? पुण्यात पडद्यामागे घडामोडी

Smith Surpasses Dravid: ऑस्ट्रेलिया 'बॉक्सिंग डे' टेस्ट हरले, पण कर्णधार स्मिथने द्रविड-कोहलीला मागे टाकत रचले मोठे विक्रम

Nagpur Municipal Election : ...तर एकत्र लढणार ‘महाविकास आघाडी’; काँग्रेसकडून ३२ जागा सोडण्याची शक्यता

Viral Video: विराट कोहलीचा व्हिडिओ काढण्यासाठी एका ड्रायव्हरने लढवली अनोखी शक्कल, नेटकरी म्हणाले...

Crime News : 'पीडितेने जबाब बदलला तरीही...' मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या पित्याला हायकोर्टाचा मोठा झटका

SCROLL FOR NEXT