Ravindra Jadeja Knee Recovery Journey  esakal
क्रीडा

Ravindra Jadeja : 'यांनी' खूप केलं! तुझ्यासाठी नाही तर देशासाठी... जडेजाने कोणाचे मानले मनापासून आभार?

अनिरुद्ध संकपाळ

Ravindra Jadeja Knee Recovery Journey : भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा जवळपास 5 महिन्यानंतर भारतीय संघात परतत आहे. ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी त्याची संघात निवड झाली आहे. याचबरोबर त्याला राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमीतून फिट झाल्याचा ग्रीन सिग्नल देखील मिळाला आहे. नुकतेच जडेजाने रणजी ट्रॉफीचा एक सामना खेळून मॅच फिटनेस देखील सिद्ध करून दाखवला आहे.

रविंद्र जडेजाने आपल्यासाठी हे 5 महिने कसे होते हे बीसीसीआयच्या एका व्हिडिओत सांगितले. त्याने त्याची मानसिकता काशी होती. एनसीएमधील फिजिओ आणि ट्रेनर यांनी त्याची कशी मदत केली हेही या व्हिडिओत सांगितले. त्याने फिजिओ आणि ट्रेनरचे आभार देखील मानले.

जडेजा व्हिडिओत म्हणाला की, 'जवळपास 5 महिन्यांनी टीम इंडियाची जर्सी घातल्याने खूप खूश आहे. मी स्वतःला नशीबवान समजतो की मला पुन्हा एकदा संधी मिळाली आहे. हे पाच महिने चढ उताराचे होते. क्रिकेटपासून दूर राहणे निराशाजनक असते. मी फिट होण्यासाठी आतुर झालो होतो.'

जडेजाने लवकरात लवकर फिट होण्यासाठी एनसीएमधील फिजिओ आणि ट्रेनर यांनी केलेल्या मदतीचे देखील आभार मानले.

जडेजा म्हणाला, 'शस्त्रक्रियनंतरचा काळ खूप अवघड होता. मी कोठेही बाहेर जाऊ शकत नव्हतो. रिहॅब, ट्रेनिंगमध्ये सातत्य राखणे खूप गरजेचे होते. यामध्ये एनसीएचे फिजिओ आणि ट्रेनर यांनी माझी खूप मदत केली.'

'त्यांनी माझ्या गुडघ्याची ताकद वाढवण्यासाठी खूप कष्ट घेतलेत. त्यांनी मला खूप वेळ दिला. रविवारी सुट्टी असते मात्र रविवारी देखील जे माझ्यासाठी काम करत होते. तुझ्यासाठी नाही तर देशासाठी कर असं म्हणत माला प्रोत्साहन दिले.'

भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाने रणजी ट्रॉफी सामना देखील खेळला. याबद्दल बोलताना तो म्हणाला की, या सामन्यामुळे मला मी आता 5 दिवसाचा सामना खेळू शकतो असा आत्मविश्वास आला.

(Sports Latest News)

हेही वाचा : ढोलेरा- ग्रीनफिल्ड सिटी आणि महाप्रचंड औद्योगिक हब...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parbhani News : अतिवृष्टीग्रस्त परभणी जिल्ह्यासाठी १२८ कोटींची आर्थिक मदत मंजूर; शेतकऱ्यांना थेट खात्यात जमा होणार नुकसानभरपाई

Pune Heavy Rain: पुण्यात मुसळधार पाऊस! रस्त्यांना नद्यांचं स्वरुप, वाहतूक ठप्प; पुणेकर खोळंबले

Latest Maharashtra News Updates : पुण्यात मुसळधार पाऊस; बाणेर-औंध रस्ता वाहतुकीसाठी अजूनही ठप्प

Parner Crime : सातबारा उताऱ्यावर नोंद लावण्यासाठी आठ हजारांची लाच घेताना कामगार तलाठ्याला रंगेहाथ पकडले

Pune Heavy Rain : पाषाण परिसरात मेघगर्जनेसह पावसाची हजेरी; चाकरमान्यांचे हाल, सखल भागात पाणी साचले

SCROLL FOR NEXT