ravindra jadeja on rishabh pant out to team india vs pakistan match asia cup 2022 sports cricket kgm00 
क्रीडा

Rishabh Pant : टीम इंडियातून ऋषभ पंत 'बाहेर' अन् भारतीय खेळाडूंना माहित नाही कारण

पाकिस्तानविरुद्ध सामन्यात ऋषभ पंत प्लेइंग इलेव्हनचा भाग असेल अशी अपेक्षा होती पण...

Kiran Mahanavar

Rishabh Pant Asia Cup 2022 : आशिया कप 2022 भारताने पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध खेळला, ज्याची सुरुवात दणदणीत विजयाने झाली. 28 ऑगस्ट रोजी दुबईत खेळवण्यात आलेला सामना टीम इंडियाने 5 विकेटने जिंकला होता. या सामन्यात ऋषभ पंत प्लेइंग इलेव्हनचा भाग असेल अशी अपेक्षा होती. पण संघाच्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा झाली तेव्हा त्यात पंतचे नाव नव्हते. त्याच्या जागी दिनेश कार्तिक खेळताना दिसला. ऋषभ पंत प्लेइंग इलेव्हनमधून का बाहेर आहे, असा प्रश्न उपस्थित झाला. तो जखमी नाही तरी त्याला संघातून वगळण्यात आले आहे? असाच प्रश्न टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजाला पत्रकारांनी पत्रकार परिषदेत विचारला.

पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने पंतला सामन्यात का संघात घेतल नाही असा प्रश्न विचारला. यावर जडेजा म्हणाला, मला हे अजिबात माहित नाही. हा माझ्या पुस्तकाबाहेरचा प्रश्न आहे. जडेजाने हसत हसत हे उत्तर दिले, ज्यावर उपस्थित सर्वजण हसले. पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर आता भारतीय संघाला अ गटातील दुसरा सामना हाँगकाँगविरुद्ध खेळणार आहे. या सामन्याबाबत जडेजा म्हणाला की, टी-20 फॉरमॅट खूपच लहान आहे. यामध्ये कोणत्याही संघाला हलके घेऊ नये. भारतीय संघ या सामन्यात हाँगकाँगला हलक्यात घेणार नाही.

भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी केली आणि पाकिस्तानला 19.5 षटकात 147 धावांवर बाद केले आणि त्यानंतर 19.4 षटकात 5 विकेट्स घेत लक्ष्य गाठले. गोलंदाजीत भुवनेश्वर कुमारने चार, हार्दिक पांड्याने तीन बळी घेतले, तर फलंदाजीत विराट कोहली (35), रवींद्र जडेजा (35) आणि हार्दिक पांड्या (33) यांनी शानदार खेळी केली. पंड्याला त्याच्या अष्टपैलू कामगिरीसाठी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू दिसणार एकाच मंचावर; शिवसेना-मनसेची आज संयुक्त विजयी रॅली, मराठीसाठी 'या' नेत्यांची धडाडणार तोफ

मोठी बातमी! आषाढी सोहळ्याच्या रात्री उघडणार उजनी धरणाचे १६ दरवाजे; सध्या धरणात १७ हजार क्युसेकची आवक, धरणाची पाणीपातळी ७७ टक्क्यांवर

PM Narendra Modi: भारतासाठी आकाशही ठेंगणे; पंतप्रधान मोदी यांचे गौरवोद्‌गार

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

Ashadi Wari 2025: पंढरीची वारी पोचली लंडनच्या दारी!विठ्ठल-रुक्मिणीच्या पादुकांसह २२ देशांतून ७० दिवसांचा प्रवास

SCROLL FOR NEXT